चिंतन

चिंतन

चिंतन

जेव्हा जगातील सर्व तेलक्षेत्रांवर
अमेरिकेचा ताबा असेल,
तेव्हा मुस्लीमांना कुणीही दहशतवादी म्हणणार नाही,

ना मिडिया
ना जगातले शिकले सवरलेले
बर्गर खाऊन च्युईंगम चघळत असलेले लोक.

जेव्हा बस्तरमधील
सगळ्या खाणींवर
अदानीचा ताबा असेल,

मग आमची सुरक्षादले देखील 
तेथून
माघारी परततील,

तेव्हा 
नक्षलवाद हा देशांतर्गत सुरक्षिततेसाठी 
धोकादायक मानला जाणार नाही,

मी अनेकदा घाबरतो,

की जेव्हा पूर्ण विकास होईल,
आणि आमचा कुणी
शत्रू शिल्लक नसेल,

तेव्हा सरकारकडे करण्यासाठी
काम काय असेल?

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी टिपण

जब दुनिया के पूरे तेल के इलाकों पर अमरीका का कब्ज़ा हो जायेगा,
 
तब मुसलमानों को कोई भी आतंकवादी नहीं कहेगा,
 
ना मीडिया 
ना दुनिया के पढ़े लिखे 
बर्गर खा कर च्युंगम चबा रहे लोग, 

जब बस्तर 
की सारी खदानों पर 
अडानी का कब्ज़ा 
हो जाएगा,
 
फिर हमारे सुरक्षा बल भी वहाँ से वापिस आ जायेंगे,
 
तब नक्सलवाद देश की आंतरिक सुरक्षा के लिये 
खतरा नहीं माना जायेगा, 

मैं कई बार डरता हूं,
 
कि जब पूरा विकास हो जाएगा,
 
और हमारा कोई 
दुश्मन नहीं बचेगा,
 
तब सरकार के लिये करने को क्या काम बचेगा ?

©हिमांशु कुमार
himanshu kumar

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने