महादेवाचे वैदिकीकरण-ब्राह्मणीकरण

महादेवाचे वैदिकीकरण-ब्राह्मणीकरण

मूळ शिवरूपाचे-महादेवाचे
विकृतीकरण-विद्रूपीकरण
म्हणजेच वैदिकीकरण-ब्राह्मणीकरण

एक नवा पौराणिक खेळ सुरू झाला आहे.शिव हे मूळ तांत्रिक समजले जातात,जे पार्वतीपती म्हणजेच सपत्नीक आहेत,स्त्री,प्रेम,काम,रस,कुटुंब,भोग,समाज इत्यादी बाबी ते नाकारत नाहीत उलट स्विकारतात.मात्र आता त्यांना आदियोगी प्रमाणे सादर केले जात आहे.आधुनिक तथाकथित पुराणकार आता त्यांच्या मूळ द्रविडी तांत्रिक रूपाला योगी रूपात घुसवत आहेत.

हे केवळ शैवांचं वैष्णवीकरण नव्हे तर खुद्द शिव यांचेच वैष्णवीकरण किंवा ब्राह्मणीकरण होय.हे नवे शिव वैष्णवांप्रमाणे उभा गंध लावलेले आहेत.त्यांच्या भाळावरील भस्मलेप-तिहेरी विभूती पट्टा गायब करण्यात आला आहे.आता तंत्र आणि तांत्रिक शिव योग आणि योगीच्या आभामंडळात लपवले जातील.योगीसोबत ब्रह्मचर्य,अध्यात्म,परलोक,स्त्री तिरस्कार आणि राष्ट्रीय झुंडवाद सहजपणे जोडता येणार आहे.याच गोष्टीची आजकालच्या 'बुवा-बाबा-पुढारी-उद्योगपती' म्हणजेच 'रिलिजन-पाॅलिटिक्स-कार्पोरेट' यांना आवश्यकता आहे.

बघत राहा,
नवे पुराण लिहिले जात आहे!

तांत्रिक शिव यांच्यापासून ब्राह्मणवादाला सुरूवातीपासूनच धोका राहिला आहे.योगी शिव सोबत भारतातील सगळ्या बुरसटलेल्या रूढी,परंपरा आणि अंधश्रद्धा सुरक्षित राहातात.तर तांत्रिक शिव सोबत सांख्य,लोकायत,आजीवक आणि चार्वाक यांचा भौतिकवाद आणि इहवादी दृष्टिकोन,प्रेम आणि सन्मान एकदम जिवंत होतो.परंतू योगींसोबत याउलट वर्णाश्रमधर्मी ब्राह्मणवाद जिवंत होतो.

नीट विचार करा
तांत्रिक शिव हे योगी शिव असल्याचे सांगत समाजाला कुठल्या दिशेने आणि का नेले जात आहे??

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

एक नया पौराणिक खेल शुरू हो चुका है। शिव मूलतः तांत्रिक हैं, सपत्नीक हैं, नारी, प्रेम, काम, रस, परिवार, भोग, समाज आदि को नकारते नहीं बल्कि स्वीकारते हैं। अब उन्हें आदियोगी की तरह प्रक्षेपित किया जा रहा है। आधुनिक पुराणकार अब उनके द्रविड़ तांत्रिक रूप को योगी के रूप में ढाल रहे हैं। 

यह शैवों का वैष्णवीकरण नहीं बल्कि स्वयं शिव का वैष्णवीकरण या ब्राह्मणीकरण है। ये नये शिव वैष्णवों की तरह सीधा/खड़ा तिलक लगाये हुए हैं। तीन क्षैतिज या आड़ी रेखाओं वाला त्रिपुंड तिलक गायब कर दिया गया है। अब तंत्र और तांत्रिक शिव को योग और योगी के आभामण्डल में छिपाया जाएगा। योगी के साथ ब्रह्मचर्य, अध्यात्म, परलोक, नारी का तिरस्कार और राष्ट्रीय कबीलावाद आसानी से जोड़ा जा सकता है। इसी बात की आजकल के "बाबा- नेता-उद्योगपति" अर्थात "रिलिजन-पॉलिटिक्स-कॉर्पोरेट" को जरूरत है।

देखते जाइये, नया पुराण लिखा जा रहा है। 

तांत्रिक शिव से भारत के ब्राह्मणवाद को शुरू से ही बड़ा खतरा रहा है। योगी शिव के साथ भारत के सारे रूढ़िवादी मूल्य और अंधविश्वास सुरक्षित रहते हैं। तांत्रिक शिव के साथ मूलसांख्य, लोकायतों, आजीवकों और चार्वाकों का भौतिकवाद और इस-लोक का प्रेम और सम्मान एकदम जिन्दा हो जाता है। लेकिन योगियों के साथ वर्णाश्रमधर्मी ब्राह्मणवाद जिन्दा हो जाता है।

गौर कीजिए तांत्रिक शिव को योगी शिव बताकर समाज को किस दिशा में और क्यों ले जाया जा रहा है?

©संजय श्रमण
Sanjay Shraman 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने