१.
नकाशे वाचणे जाणतात मिसाईल्स
नकाशांतलं काहीसुद्धा नष्ट करू शकतात मिसाईल्स
परंतू मानवतेच्या स्वप्नांना
लक्ष्य करू शकत नाहीत मिसाईल्स
स्वप्नं कुठल्याही नकाशात येत नाहीत
२.
युद्धात पूल उद्ववस्त होऊ शकतात
रस्ते खड्ड्यांमध्ये बदलू शकतात
निर्दोष नागरीक मारले जाऊ शकतात
सत्ता खाली खेचल्या जाऊ शकतात
पण गुलाम बनवले जाऊ शकत नाहीत
धगधगते मेंदू
भीषण युद्धामध्ये देखील जन्म घेऊ शकते
स्वातंत्र्याची आग
३.
जेव्हा रणगाडा त्याला चिरडत
त्याच्यावरून धडधडत गेला
तो आपल्या गाडीमधून बाहेर पडला
आणि रणगाड्याच्या मूर्खपणावर
हसत हसत निघून गेला
हे केवळ एक दृष्य मात्र नाहीये
हे जगभरातल्या तमाम हुकूमशहांना एक सामान्य नागरीकाचं थेट आव्हान होय
४.
सीमेपल्याड गरजणार्या
एका वेड्या महत्वाकांक्षेच्या विरूद्ध
आईने सांभाळलीये ए के ५६
वडिलाच्या हातात पेट्रोल बाॅम्ब आहे
भाऊ भूसुरूंग अंथरत आहे
बहिण मॅगझिन्स पॅक करतीये
मुलगा जखमींच्या देखरेखीत गुंतलाय
नातेवाईक आघाडीवर निघून गेलेत
शांतीसाठी सुद्धा कधीकधी
उचलावी लागतात शस्त्रं
खूप कमी लोकांना ठाऊक असतं
की जेव्हाही मरण थेट आव्हान बनून येतं,
अमरतेची संधीसुद्धा सोबत घेऊन येतं
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
युद्ध: कुछ तस्वीरें
1.
नक्शे पढ़ना जानती हैं मिसाइलें
नक्शे से कुछ भी मिटा सकती हैं मिसाइलें
लेकिन मनुष्यता के सपनों को
निशाना नहीं बना सकती मिसाइलें
सपने किसी नक्शे में नहीं आते
2.
युद्ध में पुल ध्वस्त हो सकते हैं
सड़कें गड्ढों में तबदील हो सकती हैं
निर्दोष नागरिक मारे जा सकते हैं
तख्त गिराये जा सकते हैं
पर गुलाम नहीं बनाये
जा सकते सुलगते हुए दिमाग
भीषण युद्ध के बीच भी जन्म ले सकती है
आजादी की आग
3.
जब टैंक उसे कुचलते हुए
उसके ऊपर से गुजर गया
वह अपनी गाड़ी से बाहर निकला
और टैंक की बेवकूफी पर हंसता हुआ
निकल गया
यह एक दृश्य भर नहीं है
यह दुनिया के सारे तानाशाहों को
एक अदने नागरिक की चुनौती है
4.
सीमा के पार घुमड़ती
एक पागल महत्वाकांक्षा के विरुद्ध
मां ने क्लाश्निकोव संभाल ली है
पिता के हाथों में पेट्रोल बम है
भाई सुरंगें बिछा रहा है
बहन मैगजीनें पैक कर रही है
बेटा घायलों की देख-भाल में जुटा है
रिश्तेदार मोर्चे पर निकल गये हैं
शांति के लिए भी कभी- कभी
उठाने पड़ जाते हैं हथियार
बहुत कम लोगों को पता होता है
कि जब भी मृत्यु सीधी चुनौती बनकर आती है
अमरता का अवसर भी साथ लाती है
©सुभाष राय
Subhash Rai