कुण्या जातीचा हायेस भाऊ?

कुण्या जातीचा हायेस भाऊ?




ते तुमच्या निवडणुकीत..!

कुठल्या जातीचा हायेस,भाऊ?
दलित हाय,सायेब!
नाय म्हणजे कुणामधी येतोस?

तुमच्या 'शिवीगाळी'त येतो
गटारांच्या घाणराडीत येतो
आणि वेगळ्या केलेल्या 
ताट-वाटीत येतो,
सायेब!

मला वाटलं हिंदूंमध्ये येतोस!
येतो ना सायेब!
पण ते तुमच्या
निवडणूकीत!

काय खातोस भाऊ?
जो एक दलित खातो,सायेब!
नाही म्हणजे काय काय खातो?

आपला मार खातो
कर्जाचं ओझं खातो
आणि तंगीच्या काळात नान आणि 
कधी लोणचं पण खातो,सायेब!

नाही मला वाटलं की कोंबडी 
वगैरे खातोस!
खातो ना साहेब!
पण ते तुमच्या निवडणूकीत!

काय पितोस भाऊ?
जो एक दलित पित असतो,साहेब!
नाही म्हणजे काय काय पितोस?

अस्पृश्यतेची वेदना पितो
भग्न स्वप्नांचे दुःख गिळतो
आणि नागव्या डोळ्यांनी पाहिलेले
सगळे भ्रम पितो,सायेब!

मला वाटलं दारुबिरु पितोस!
पितो ना सायेब!
पण ते तुमच्या निवडणूकीत!

काय मिळालं भाऊ?
जे दलितांना मिळतं ते सायेब!
नाही म्हणजे काय काय मिळालं?
झिडकारलेलं जीवन
तुम्ही सोडलेली घाण
आणि त्यावर पुन्हा तुमच्यासारख्या
परजीवींची सेवा पण,सायेब!

मला वाटलं आश्वासनं मिळालीत!
मिळतात ना सायेब!
पण ते तुमच्या निवडणूकीत!

काय केलंस भाऊ?
जो दलित करतो,साहेब!
नाही म्हणजे काय काय केलंस?

शंभर दिवस तळ्यावर राबलो
सकाळ-संध्याकाळ घामानं डबडबलो
आणि येता-जाता मालकाच्या 
पाया पडलो,सायेब!

मला वाटलं एखादं मोठं काम केलंस!
केलंय ना सायेब!
आपल्या निवडणूकीचा प्रचार...!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

आपके चुनाव में

कौन जात हो भाई?
“दलित हैं साब!”
नहीं मतलब किसमें आते हो?
आपकी गाली में आते हैं
गंदी नाली में आते हैं
और अलग की हुई थाली में आते हैं साब!
मुझे लगा हिंदू में आते हो!
आता हूं न साब! पर आपके चुनाव में।

क्या खाते हो भाई? 
“जो एक दलित खाता है साब!” 
नहीं मतलब क्या-क्या खाते हो? 
आपसे मार खाता हूं
कर्ज़ का भार खाता हूं
और तंगी में नून तो कभी अचार खाता हूं साब!
नहीं मुझे लगा कि मुर्गा खाते हो!
खाता हूं न साब! पर आपके चुनाव मे।

क्या पीते हो भाई? 
“जो एक दलित पीता है साब! 
नहीं मतलब क्या-क्या पीते हो?
छुआ-छूत का ग़म
टूटे अरमानों का दम
और नंगी आंखों से देखा गया सारा भरम साब!
मुझे लगा शराब पीते हो!
पीता हूं न साब! पर आपके चुनाव में।

क्या मिला है भाई
“जो दलितों को मिलता है साब! 
नहीं मतलब क्या-क्या मिला है?
ज़िल्लत भरी ज़िंदगी
आपकी छोड़ी हुई गंदगी
और तिस पर भी आप जैसे परजीवियों की बंदगी साब!
मुझे लगा वादे मिले हैं!
मिलते हैं न साब! पर आपके चुनाव में।

क्या किया है भाई?
“जो दलित करता है साब!
नहीं मतलब क्या-क्या किया है?
सौ दिन तालाब में काम किया
पसीने से तर सुबह को शाम किया
और आते जाते ठाकुरों को सलाम किया साब!
मुझे लगा कोई बड़ा काम किया!
किया है न साब! 
आपके चुनाव का प्रचार!

©बच्चा लाल उन्मेष
Bachcha Lal Unmesh 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने