जेव्हा एक स्त्री फेमिनिस्ट असते

जेव्हा एक स्त्री फेमिनिस्ट असते

जेव्हा एक स्त्री फेमिनिस्ट असते

मल्लयुद्ध आहे 
स्त्रीचे फेमिनिस्ट असणे
हरलेली,
घेरली गेलेली पराभूत स्त्री
जेव्हा उठू पहाते,
पालटू पहाते, 
आपली परिस्थिती
तेव्हा दाबणारा दुप्पट ताकदीने दाबतो
दबलेल्या स्त्रीला.

फेमिनिस्ट असणे
मैत्रीचे निमंत्रणपण असू शकते
की या स्विकार करा 
आमचे असणे
जसे आम्ही केलेय स्विकार 
तुमचे असणे.

फेमिनिस्ट असणे एकटे
असणेसुद्धा आहे
की मल्लयुद्धात हरलेला पुरुष
वा मित्र होण्याचे हुकलेला पुरुष
स्त्रीला जेव्हा जिवंत स्विकारत नाही
तेव्हा स्त्रीच्या जिवंत राहाण्याची जी जिद्द असते 
तेच फेमिनिस्ट असणे होय.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

जब एक स्त्री फेमिनिस्ट होती है 

मल्ल युद्ध है 
स्त्री का फेमिनिस्ट होना 
कि हारी घिरी पस्त स्त्री 
जब उठना चाहती है 
पलटना चाहती है अपनी स्थिति 
तब दबोचने वाला दोगुनी शक्ति से दबाता है 
दबी हुई स्त्री को 

फेमिनिस्ट होना  
मित्रता का निमंत्रण भी हो सकता है 
कि आओ 
स्वीकार करो हमारा होना 
जैसा हमने किया है तुम्हारे होने को 

फेमिनिस्ट होना 
अकेले होना भी है 
कि मल्ल युद्ध में हारा पुरुष 
या मित्र होने से चुक गया पुरुष 
स्त्री को जब
जिन्दा   स्वीकार नहीं करता 
तब स्त्री की जिन्दा रहने की जो जिद है 
वही फेमिनिस्ट होना है 

©वीरेंदर भाटिया
Virendar Bhatia
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने