🍁
ओलसर आणि मिट्ट काळोखाने भरला होता
जवाहर लाल नेहरु टनल
आणि आम्ही दहशत घेतलेले लोक
पळून जात होतो भयव्याकुळ बससेमधून
जवाहर लाल नेहरु टनलमध्ये
जणू तुडूंब भरला गेला होता अंधार इतकी वर्षे
आणि टप टप पडणारे थेंब म्हणजे
हमसून हमसून रडत होता
पांचाल पर्वत जणू
नेहरुंच्या गर्वावर किंवा
आमच्या स्थितीवर
आमच्या बसेस अडकून पडल्या होत्या बोगद्यात आणि आता त्यांचा धूर पण सामील झाला होता अंधारात
कानात अजूनही घूमत होत्या
जिहादींच्या शिव्या
त्यांच्या घोषणा
धमक्या
ठो ठो !!
गोळ्यांचे आवाज
हातगोळे आणि बाॅम्बचे खिदळणे
अल जिहाद!अल जिहाद!
अल जिहाद!
जवाहर लाल नेहरू टनलमध्ये
आमच्या आक्रसलेल्या शरीरात दबलेल्या कोलाहलात लपून बसलेल्या रक्तबंबाळ आठवणी या वेळेस का जाग्या होत होत्या
ओलसर अंधारात
शून्यात उठून उभ्या राहात होत्या
बलात्कारीत होत होत्या
तडफडणार्या विलाप करणार्या
आमच्या बहिणी
घरांच्या कवाडांवर
रक्ताचे ठिबकणारे शिंतोडे
चितारतायत ही नव नवी भित्तीचित्रे
आमच्या समोर
बोगद्यात अडकलो होतो आम्ही
निळसर होते आमचे चेहरे
आणि ओठ पिवळे
पापुद्र्यासारखे
सुकलेले तळपाय फाटले होते
आमची धरती सौंदर्यशास्त्राचा दुष्काळ झेलत होती दशकांपासून
टका मका बघायची
सुन्या आकाशात कधी नाही प्रकटले
इंद्रधनुष्य इथे
की गायला लागेल
गुडघ्यापर्यंत फुलांनी आच्छादलेली बाग,
एखादी तिच्या आत
सद्या आम्हाला बोगद्यामधून जात बाहेर पडायचे होते
पर्वताच्या दूसर्या बाजूस
उर्वरीत हिंदुस्तानात
एकमेव होते समाधान
की कसेबसे वाचवून आणल्या होत्या
आम्ही भयभीत लेकीसूना आमच्यासोबत
मुलांची शाळेची दफ्तरे
आणि हडकलेल्या ज्येष्ठांचे उरले-सुरले जीवन
हीच होती कमाई या क्षणी
आमची पाच हजार वर्षांची
बाकी सगळं राहिलं होतं मागे
अक्रोड आणि चिनारांच्या
हिरव्यागर्द छायेत
जिभलीचा खेळ
पाठशिवणी
पर्वतांच्या धुरकटतेत दिसेनाशा होत चाललेल्या
चिमण्यांना पाहून
आमचे उदास होऊन जाणे
मागे राहिला होता
इतिहास आणि संवत्सर आमचे
मिथक
देव आणि तीर्थ आमचे
जत्रा-यात्रा
सण-उत्सव
घरदार आमचं
त्यांच्या आठवणी होत्या आमच्यासोबत पळत
गुपचूप
जशा सांजवेळी पळणार्या गावातून
आल्या होत्या पळत काही अंतरावर
आमच्या गायीदेखील
सामान लादलेल्या ट्रकांच्या मागे मागे
बसेस चित्कारत आहेत अंधारात
जणू करताहेत आर्जव
जवाहर लाल नेहरूंच्या
'आनंद भवना'त
पण हे खरे होते
की आम्ही नव्हतो अलाहाबादेत यावेळेस
जिथे गंगा होती
यमुना होती
सरस्वती होती
परस्परांत सामावलेल्या
आम्ही होतो अंधारात
गारठलेल्या थंडीत
निमुळत्या श्वसननलिकेत अडकलेल्या
हवेच्या कणासारखे
आणि जग होते ईर्ष्येने भरलेले
आमच्याविषयी
जेव्हा आम्ही पलायन करत होतो स्वर्गातून
जीव मुठीत होता आमचा
अंगरख्याच्या आत लपवलेली
चिनारची पाने
आणि खिशांनी ठासून भरली होती
गावाची माती
माझ्यापुरते बोलायचे झाल्यास
मी सदर्याच्या आत खोचलेल्या होत्या
लल्लेश्वरीच्या कविता
ज्यांना स्पर्श करून करून
या ओलसर आणि गडद अंधारात
मी होत होतो थोडा फार जिवंत
'अरे वेड्या
कोण मरेल आणि मारेल कुणाला?'
कानात सांगत होती लल्लेश्वरी मला
निश्चित होतं की आम्ही पळ काढत होतो आणि
पेरल्या जात होत्या अफवा
भाजल्या जात होत्या
लोकशाहीच्या तव्यावर
लबाडखोरीच्या भाकरी
हे मानवाधिकाराचे दिवस होते
आणि आम्हास नव्हता मानवाधिकार
गप्प होती मेंढरं
आणि हाच होता सद्भाव
खाटीकखान्याचा
चित्कारत होती वाहने
आतुर होतो आम्ही
बोगद्याच्या बाहेर होता प्रकाश
बोगद्याच्या बाहेर होत्या आकांक्षा
बोगद्याबाहेर होती सुरक्षितता
बोगद्याबाहेर होते कवी,
कवी कलावंत
आणि संस्कृतीकर्मी
मोकळे होते आकाश
बोगद्याच्या बाहेर
आणि आम्ही उतरलो पर्वतावरून
शरणार्थी शिबीरात
पसरलो संविधानाच्या पोकळ तंबूत
वळवळणार्या किड्यांप्रमाणे
मिरवणूकीत
धरण्यांमध्ये
आम्ही उधळले गेलो घोषणांत
दडपून गेलो अत्याचारात
इथे ऊन होते
अॅसिड होते
झळया होत्या
साप होते विंचू होते
रोग होते स्मशान होतं
पांघरायला नभांगण होतं
निजण्यास हिंदुस्तान होता
माझा देश महान होता.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जवाहर टनल
गीले और घने अँधेरे से भरी थी
जवाहर लाल नेहरू सुरंग
और हम दहशत खाए लोग
भाग रहे थे सहमी बसों में
जवाहर लाल नेहरू सुरंग में
जैसे कूट कूट कर भर गया था अँधेरा
इतने वर्ष
और टप टप गिरती बूँदें ये
ज़ार ज़ार रो रहा था पाँचाल पर्वत
नेहरू के गुमान पर
या हमारे हाल पर
हमारी बसें फँसी पड़ीं थीं सुरंग में और अब उनका धुआँ भी
शामिल था
अँधेरे में
कानों में अभी भी गूँज रही थी
जेहादियों की गालियाँ
उनके उद्घोष
धमकियाँ
ठांय ठायं !!
गोलियों की अठखेलियाँ
हथगोले और बमों के अट्टहास
अल जेहाद !
अल जेहाद ! अल जेहाद !
जवाहर लाल नेहरू सुरंग में
हमारे सिकुड़े शरीरों के अन्दर दबे कोलाहल में
छिपी बैठीं
लहुलुहान स्मृतियाँ इस समय
क्यों जाग रहीं थीं
गीले अँधेरे में
शून्य में उभर रही थीं
बलात्कृत हो रहीं थीं
छटपटाती बिलखती
हमारी बहनें
घरों के दरवाज़ों पर
खून की टपकतीं छींटें उकेरते
ये नये नये भित्ति चित्र
हमारे सामने
सुरंग में फँसे थे हम
नीले थे हमारे चेहरे
और होंठ थे पीले
पपड़ियाए
जैसे सूखी बिवाई फटी थी
हमारी धरती सौन्दर्यशास्त्र की
झेलती अकाल
दशकों से
टुकुर टुकुर देखती
सूने आकाश में कभी नहीं प्रकटा
इन्द्रधनुष यहाँ
कि गा उठती घुटनों तक फूलों से भरी
उपत्यका कोई
भीतर उस के
फिलहाल हमें सुरंग से होते हुए
निकलना था
पर्वतों के दूसरी तरफ
शेष हिन्दुस्तान में
एकमात्र था इत्मीनान
कि जैसे तैसे बचा लाए थे
हम खौफ ज़दा बहु बेटियाँ अपने साथ
बच्चों के स्कूली बस्ते
और कृषकाय बुज़ुर्गों की शेष ज़िन्दगी
यही थी उपलब्धि इस वक़्त
हमारे पाँच हज़ार वर्षों की
बाकी सब छूट गया था पीछे
अखरोट और चिनारों की हरी छाँव में
स्टापू का खेल
चिमेगोईयाँ
पर्वतों के धुँधलके में ओझल हो जातीं
चिड़ियों को देख
हमारा उदास हो जाना
पीछे छूट गया था
इतिहास और संवत्सर अपना
मिथक
देवता और तीर्थ अपने
मेले ठेले
तीज त्यौहार
घर बार अपना
उनकी स्मृतियाँ थीं हमारे साथ भागतीं
चुपचाप
जैसे मुँह अँधेरे भागते गाँव से
चली आई थीं दौड़ती कुछ दूर
हमारी गायें भी
सामान लदे ट्रकों के पीछे
बसें चिंघाड़ रहीं हैं अँधेरे में
जैसे लगा रही हों गुहार
जवाहर लाल नेहरू के ‘आनन्द भवन’ में
परंतु यह सच था
कि हम नहीं थे इलाहाबाद में इस समय
जहाँ गंगा थी
जमुना थी
सरस्वती थी
आपस में घुल मिल
हम थे अँधेरे में
ठिठुरती ठ्ण्ड में
सँकरी श्वास नली में अवरुद्ध
हवा के कण जैसे
और संसार था ईर्ष्या से भरा
हमारे प्रति
जबकि हम भाग रहे थे स्वर्ग से
भिंची हथेलियों में जान थी हमारी
कमीज़ अन्दर थे छिपाए
चिनार के पत्ते
और जेबों में ठूँस भरी थी
गाँव की मिट्टी
जहाँ तक मेरी बात है
मैंने कमीज़ के अन्दर खोंस रखी थीं
ललद्यद की कविताएं
जिन्हे छू छू कर
इस गीले और सघन अँधेरे में
मैं हो रहा था तनिक तनिक ज़िन्दा
“अरे पगले ,
कौन मरेगा और मारेंगे किस को ?”
कान में कह रही थी लल्द्यद मुझसे
तय था कि हम भाग रहे थे
और गढ़ी जा रही थी अफवाहें
सेंकी जा रही थीं
लोकतंत्र के तवे पर
झूठ की रोटियाँ
ये मानवाधिकारों के दिन थे
और हमारे नहीं थे मानवाधिकार
चुप थीं भेड़ें
और यही था सद्भाव
कसाई बाड़े का
चिंघाड़ रहे थे वाहन
आतुर थे हम
सुरंग से बाहर थी रोशनी सुरंग से बाहर थी उम्मीदें
सुरंग से बाहर थी सुरक्षा
सुरंग से बाहर थे कवि, कवि कलाकार
और संस्कृतिकर्मी
खुला था आसमान सुरंग से बाहर
और
हम उतरे पर्वतों से शरणार्थी केम्पों में
फैल गए सम्विधान के फफोले तम्बुओं में
बिलबिलाए कीड़ों की तरह
जुलूसों में
धरनों में
हम उछले नारों में
दब गए अत्याचारों में
यहाँ धूप थी
तेज़ाब था
लू थी
साँप थे बिच्छू थे
रोग थे
श्मशान था
ओढ़ने को आसमान था
सोने को हिन्दुस्तान था
मेरा देश महान था।
©अग्निशेखर
Agnishekhar