युद्ध आणि फुलं

युद्ध आणि फुलं

युद्ध आणि फुलं

समजा
जर जगातल्या सगळ्या वस्तू
फुलांच्या असत्या,
बाॅम्बही फुलांचे असते
बारूददेखील फुलांचे
बंदुकीतली गोळीसुद्धा फुलांचीच
रथाचे घोडे,असूड,बरछी,भाले
तोफा,मिसाईल्स 
सगळेच्या सगळे फुलांचेच असते
एवढेच काय युद्धातील दोन्ही पक्षदेखील फुलांचे असते

सम्राट अशोक आजीवन
युद्ध लढत राहिले असते
फुलांनी बनलेल्या सैनिकांना फुलं चालविण्यास सांगितलं असतं
फुलं सुटून फुलांना लागली असती
आणि फुलांनी वश झाले असते 
अवघे कलिंग

कलिंगची राजकन्या असलेल्या फुलासाठी
फुलांशी लढलं गेलं असतं,
फुलाचं दुःख फुलांना सांगितलं 
गेलं असतं

तेव्हा 
जगातल्या सर्वात सुंदर फुलानं
जन्म घेतला असता,
युद्ध लढण्याकरिता

बघा,
युध्द लढणं इतकं सुंदरदेखील असू शकलं असतं!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता
सोचो,
यदि दुनिया की सारी चीजें 
फूल की होती,
बम भी फूल के होते 
बारूद भी फूल के,
बन्दूक की गोली भी फूल के,
रथ के घोड़े, चाबुक, बरछी, भाले,
तोप, मिसाइल, सब के सब फूल के होते।
यहाँ तक कि
युद्ध के दोनों पक्ष भी फूल के होते।

अशोक आजीवन युद्ध लड़ते,
फूल के बने सैनिकों को फूल चलाने कहते
फूल निकलकर फूल को लगते और
फूल से पटा होता सारा 'कलिंग'।

कलिंग राजकुमारी फूल के लिए
फूल से लड़ते,
फूल की पीड़ा को फूल से कहते।

तब 
दुनियां का सबसे खूबसूरत फूल
जन्म लेता,
युद्ध लड़ने के लिए।

सोचो, 
युद्ध लड़ना इतना सुंदर भी हो सकता था!

©मनकेश्वर
Mankeshwar Kumar

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने