पूर्वजांसाठी

पूर्वजांसाठी

पूर्वजांसाठी

त्या वृद्धेजवळ
चंद्र येऊन बसतो
पाठ,खांदे,मांडी
आणि तिच्या पदराखाली
तारे बेपर्वा लवंडत असतात
तरीही ती गोष्टी सांगताना
कधी नाही थकत
तिच्या किस्से आणि गाण्यांच्या
झर्‍यामधून चंद्र-तारे 
मावळत-उगवत राहातात

नद्यांच्या एकूण एक लाटा
तिच्या चेहर्‍यावरती
सुरकुत्यांप्रमाणे
क्रिडा करतात
तिच्या श्वासांमधून
जंगलातली सगळी झाडं
थिरकत असतात
ती जेव्हा हसत असते
पाखरांचा थवा
धरणीच्या पाठीवर
डोंगरा डोंगरावर खिदळत असतो

काळापल्याडची ती वृद्धा
देमता मुंग्यांप्रमाणे
चटकदार आहे
करवंदासारखी गोड
आणि सुपारीप्रमाणे टणक

तिला कुठलीही जादू नाही येत
पण ती कधी मातीवानी ओली
तर कधी कातळासारखी
कठीण
भूतकाळ,वर्तमान आणि भविष्यकाळाला
तंबाखूसारखी चूरडत
कुठेही आडवी उभी भेटत असते

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

पुरखों के लिए

उस बुढ़िया के पास
चांद आकर बैठता है
पीठ, कंधे, जांघों
और उसकी गोद में 
तारे बेफिक्र लुढ़क जाते हैं
फिर भी वह कहानियां सुनाते
कभी नहीं थकती
उसके किस्सों-गीतों के झरने में
चांद-तारे डूबते-उगते रहते हैं

नदियों की सभी लहरें
उसके चेहरे पर
झुर्रियों की तरह
अठखेलियां करती हैं
उसकी सांसों में 
जंगल के सारे पेड़ झूमते हैं
वह जब हंसती है
पंछियों का झुण्ड
धरती को बेतराये
पहाड़-पहाड़ खिलखिलाता है

काल से परे वह बुढ़िया
देमता चींटियों की तरह
नमकीन है
केऊंद-सी मीठी
और सुपारी की तरह कसैली

उसे कोई जादू नहीं आती
पर वह कभी मिट्टी की तरह गीली
तो कभी चट्टानी पत्थरों की तरह सख्त
अतीत, वर्तमान और भविष्य को
तम्बाकू की तरह मसलते हुए
कहीं भी अड़ी-खड़ी मिल जाती है

 ©वंदना टेटे
Vandna Tete 


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने