ज्यांना वाचायला येत होतं
त्या प्रेमपत्रानं फसवल्या गेल्या,
ज्यांना येत नव्हतं { वाचायला }
त्या एक जोड झुब्याने.
चमचमीतपणाला चटावलेल्या
एक प्लेट 'चायनीज'ने,
'तुझ्या हाताला चव आहे!'
ऐकून फसवल्या गेल्या त्या सगळ्या
ज्या वाचूनसुद्धा पकडू नाही शकल्या
इतिहासातली सर्वात मोठी लबाडी.
प्रेमात केवळ ईश्वराला साक्षी मानणार्या
एका चोरलेल्या आळसावलेल्या दुपारी मिळालेल्या
एका चिमूटभर कुंकवाने फसवल्या गेल्या.
फसवले गेलेल्या या सगळ्याच्या सगळ्या
तोवर राहिल्या फुललेल्या
जोवर
प्रेमाचा वृक्ष वठून जाऊन त्यांच्या शरीरासोबत
नाही जळाला.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जो पढ़ना जानती थी,
वे प्रेमपत्रों से ठगी गई,
जो नहीं जानती थी
वे एक जोड़ी झुमकों से.
चटोरपन की मारी
एक प्लेट चाऊमिन से,
तेरे हाथों में स्वाद है! '
सुनकर ठगी गई वे सारी
जो पढ़कर भी पकड़ नहीं पाई
इतिहास का सबसे बड़ा झूठ.
प्रेम में केवल ईश्वर को साक्षी मानने वाली
एक चुराई अलसाई दोपहरी में मिले
एक चुटकी सिंदूर से ठगी गई.
ठगी की मारी ये सारी की सारी
तबतक खिली रही जबतक
प्रेम का वृक्ष ठूंठ हो उनकी देह के साथ नहीं जला.
©सुजाता गुप्ता
Sujata Gupta