काश्मिरी पोरी
१
काश्मिरी पोरी सफरचंद असतात
सफरचंद ही खाण्याची गोष्ट आहे
सफरचंद झालेल्या काश्मिरी पोरी
खाल्ले जाण्याच्या नजरेने हबकून गेल्यायत.
२
काश्मिरी पोरी सफरचंद आहेत
ज्यांची कातडी लाल आहे
ज्यात भरपूर रस आहे
ज्यांना खाल्ल्याने रक्त सळसळतं,
हाच विचार करून करून काश्मिरी पोरींचं
रक्त थंड पडत चाललंय.
३
काश्मिरी पोरी मेवा आहेत
मेवा मर्दानगीला जित्तं करतो
म्हणतात,
मृत लिंग मेव्याने जिवंत झाल्याची
कथा ऐकवली जाते आहे,
वीररसाचे रडगाणे गायिले जातेय,
मृदंग वाजताहेत असे की
नपुंसकतेवरचे औषधी आहेत जणू
काश्मिरी पोरी.
४
काश्मिरी पोरी
जगभरातील तमाम मुलींमध्ये
सर्वात सुंदर आहेत
मोडून पडलेल्या सोवियत संघाच्या
पोरींमध्ये
लावण्य शोधत आपण
पालथे घातले बॅंकाक,पटाया,दुबई
ओरबाडल्या आम्ही
रशियन मुली,
काश्मिरी पोरींसाठी
हपापलेले लोक विचार करतात की
ज्या राष्ट्रात फूट पडते
तिथल्या मुली
सर्वांसाठी उपलब्ध होत असतात.
५
लुटले गेलेल्या
वा लुटण्यात आलेल्या साम्राज्यातील
बेघर झालेल्या मुली
लुटारूंच्या सर्वात पहिल्या शिकार ठरतात
शिकार करणारे
तेच लोक असतात
जे घरच्या बाईवर शंभर बुरखे हजार कुलुपे लादतात
काश्मिरी पोरी
लूटलेल्या साम्राज्यातील मुली नाहियेत म्हणून शिकारी
घरच्या बायांच्या पायात साखळदंड अडकवून मैदानात येऊन उभे राहिलेत,
शिकारी विचार करतायत
बाहेरच्या पोरी मटण असतात.
६
काश्मिरी पोरींच्या शरीरात
एकही अवयव जास्तीचा नाही
देशातल्या अन्य आया-बहिणी-लेकीसुद्धा
काश्मिरी पोरींसारख्याच
बांधेसूद-सुंदर आणि आकर्षक आहेत
काश्मिरी पोरी मात्र
सत्तामदाच्या बळी ठरताहेत
सत्ता जेव्हा जेव्हा मदाने भारलेली असते
तेव्हा तेव्हा सर्वात आधी
राष्ट्रातील स्त्रियांच्या अब्रूचे
धिंडवडे निघत असते.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जब कश्मीर में धारा 370 हटाई गई
तब कथित राष्ट्रवादी लोगों की जीभ कश्मीरी लड़कियों के लिए लपलपानी शुरू हो गयी थी।
तब की कुछ कवितायें।
कश्मीरी लड़कियां
1
कश्मीरी लड़कियां सेब होती हैं
कि सेब खाने की चीज हैं
सेब हुई कश्मीरी लड़कियां
खा जाने की नजर से सहमी हैं
2
कश्मीरी लड़कियां सेब हैं
जिनकी त्वचा लाल है
जिनमे भरपूर रस है
जिन्हें खा लेने से खून में रवानी आती है,
कश्मीरी लड़कियों का खून
यही बात सोच कर
ठंडा पड़ता जाता है
3
कश्मीरी लड़कियां मेवा हैं
मेवा मरदानगी को जिंदा करता है
मुर्दा लिंग मेवा से जिंदा होने की तहरीर सुना रहे हैं
वीर रस के रुदन गाए जा रहे हैं,
मृदंग बज रहे हैं ऐसे कि
नपुंसकता की दवा हों जैसे
कश्मीरी लड़कियां
4
कश्मीरी लड़कियां
विश्व की तमाम लड़कियों में
सबसे सुंदर हैं
टूट गये सोवियत की लड़कियों में
लावण्य खोजते हम
दौड़ आये बैंकॉक पताया दुबई
नोच डाली हमने
रशियन लड़कियां,
कश्मीरी लड़कियों के लिए
लपलपाते लोग सोचते हैं कि
जिस मुल्क मे दरार पड़ती है
वहां की लड़कियां
सबके लिए मयस्सर होने लगती हैं
5
लुट चुकी
या लूट ली गयी सल्तनत की
बेघर हो गयी लड़कियां
लुटेरों की सबसे पहली शिकार होती हैं
शिकार करने वाले
वही लोग होते हैं
जो घर की स्त्री पर सौ बुर्के हजार ताले रखते हैं,
कश्मीरी लड़कियां
लुट चुकी सल्तनत की लड़कियां नही हैं चुनांचे
शिकारी मगर
घर की औरतों के पैरों में
जंजीरें डाल कर
मैदान में आ खड़े हुए हैं,
शिकारी सोचते हैं
बाहर की लड़कियां गोश्त होती हैं
6
कश्मीरी लड़कियों के जिस्म में
एक भी अंग ज्यादा नही
मुल्क की अन्य माँ बहन बेटियां भी
कश्मीरी लड़कियों जैसी ही
सुघड़, सुंदर और आकर्षक हैं,
कश्मीरी लड़कियां मगर
सत्ता के मद की शिकार हैं
सत्ता जब-जब मद से तारी होती है
मुल्क की स्त्रियों की आबरू
सबसे पहले नीलाम होती है
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia
चित्रः साभार
मेघा दयाल
Megha Dayal