शहरातील मोठ्या भाजी मंडईत
एका बाजूला बारदान अंथरून
आपल्या शेतातलं ताजं माळवं घेऊन
बसलेली रमय्या
नेहमी सुट्या पैशांच्या हिशोबात
करत असते घोळ.
नाही....नाही... हे समजण्याची चूक करू नका की
रमय्याला येत नाही इतकेही गणित,
हां अवश्य,दोन-चार रूपये वाचवून
बंगला बांधण्याचे गणित
नाही शिकली ती.
घरात काम करणारी पारबती
मालकिनीच्या सांगण्यावरून
हसत हसत घेऊन येत असते
दोन-चार किलो मका आपल्या शेतातून आणि
महिन्याच्या हिशोबात
त्याचे पैसेदेखील धरत नाही.
तिला मुर्ख समजून
एक तिरकस स्मित
आपल्या ओठांवर नका आणू
धान्याचे मोल जाणते ती
परंतू मालकिनीच्या भांडारात
तिच्या धान्याचाही वाटा आहे
हा विचार सुखावून टाकतो तिला.
सफाई कामगाराचा पोरगा विपुल
चांगल्या तर्हेने जाणतोय की
कोपर्यातल्या घरातली शर्माकाकू
एक लहानसा कप चहा पाजण्याच्या निमित्ताने
आपल्या बागेची साफसफाई पण करून घेते
त्याच्याकडून,
हे समजू नका की
काॅलेजात बी.ए.चे शिक्षण घेत असलेला विपुल परिचित नाहीये
'शोषण' या शब्दाशी,
पण समाधानी असतो तो
सकाळच्या धावपळीमध्ये काकूचे एक काम त्याने
आटपून टाकलेय म्हणून.
तुम्ही बिनधास्त यांना म्हणू शकता
निव्वळ मुर्ख,अडाणी,गावंढळ आणि अशिक्षीत
परंतू पोतंभर पुस्तकांचे शिक्षण
जर शिकवणार नसेल मानवतेची अबकडई
जर शिकू न शकू आम्ही दुःखाला मापण्याची पद्धत
जर तीव्र नसेल संवेदना आमची
जर समजू न शकू आम्ही
सामाजिक धाग्यादोर्याचे मानसिक विज्ञान
तर मग कमी शिकलेले असण्यात काय वाईट आहे?
कमीतकमी शिल्लक तर राहतील मानवी मूल्ये
शिल्लक राहील प्रेम,स्नेह,सौहार्द
उरतील नाती
शिल्लक असेल विश्वास
आणि शिल्लक राहील
आमचे एवढेसे माणूस असणे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
इतना-सा मनुष्य होना
शहर की बड़ी सब्जी मंडी में
एक किनारे टाट का बोरा बिछाकर
अपने खेत की दो-चार ताज़ी सब्जियाँ
लिये बैठी रमैया
अक्सर छुट्टे पैसों के हिसाब में
करती है गड़बड़।
न...न....यह समझ लेने की भूल मत करना
कि रमैया को नहीं आता
इतना भर गणित,
हाँ बेशक, दो-पाँच रुपये बचाकर
महल बाँधने का गणित
नहीं सीखा उसने।
घर में काम करती पारबती
मालकिन के कहने पर
सहर्ष ही ले आती है
दो-चार किलो मक्की
अपने खेत से
और महीने के हिसाब में
उसका दाम भी नहीं जोड़ती।
उसे मूर्ख समझकर
एक तिर्यक मुस्कान
अपने होठों पर मत लाना,
अनाज की कीमत जानती है वह
लेकिन मालकिन के कोठार में
उसके अनाज का भी हिस्सा है
यह भाव संतोष से भर देता है उसे।
सफ़ाई वाले का लड़का विपुल
अच्छे से जानता है कि
कोने वाले घर की शर्मा आंटी
एक छोटा कप चाय पिलाने के बहाने
अपने बग़ीचे की सफ़ाई भी
करवा लेती हैं उससे,
ये मत समझ बैठना
कि कॉलेज में बी.ए. की पढ़ाई करता विपुल
परिचित नहीं है
"शोषण" की शब्दावली से,
लेकिन खुश होता है वह कि
सुबह-सुबह की दौड़-भाग के मध्य
आंटीजी का एक काम
उसने निपटा दिया।
आप बेशक इन्हें कह सकते हैं
निपट मूर्ख, गँवार, ज़ाहिल और अनपढ़
लेकिन बोरा भर किताबों की पढ़ाई
अगर सिखा न सके मानवता की ए बी सी डी
अगर सीख न सकें हम दु:ख को मापने की पद्धति
अगर गहन न हो संवेदना हमारी
अगर समझ न सकें हम
सामाजिक ताने-बाने का मनोविज्ञान
तो कम पढ़ा-लिखा होने में
क्या बुराई है?
कम से कम बचे रहेंगे मानवीय मूल्य
बचा रहेगा प्यार, स्नेह, सौहार्द
बचे रहेंगे रिश्ते
बचा रहेगा विश्वास
और बचा रहेगा
हमारा इतना-सा मनुष्य होना।
©मालिनी गौतम
Malini Goutam