महिला दिनःदोन कविता

महिला दिनःदोन कविता

सुंदर बायका

त्या जगातल्या सर्वात 
सुंदर बायका होत्या
ज्या पर्वतासारख्या आयुष्याला
ओलांडत,पार करत
कुठल्याही अंगणात उशीरापर्यंत
गप्पा छाटत
जोरजोराने हसत खिदळत
आणि औदासिन्य दूर ढकलून 
लावत असत.

त्यांनी लपून प्रेम केलं
आणि पाणवठ्यावर
गुणगुणताना विरहाची 
सर्वात गोड गाणी गायिली.

त्यांनी तमाम अडचणींना
मेंढरांप्रमाणे गोळा केलं
आणि त्यावर बसून आराम केला.

त्या जेव्हा दुःखी झाल्या तेव्हा शेतारानात उगवलेला झाडझाडोरा कोयत्याने कापून-छाटून आल्या.

त्यांच्या वाट्याला सर्वात 
शेवटची भाकर
सर्वात नंतर कापड
आणि सर्वात कमी आनंद आला.

त्यांनी दागिने विकून मुलांना 
शहरात धाडलं
आणि जंगलातले सर्वात सुंदर फुल निवडून आपल्या अंबाड्यात खोचलं.

त्यांनी लेकीच्या पाठवणीवेळी वाचवलेले अश्रू 
मुले परदेशी गेल्यानंतर ढाळले.

त्यांनी खर्च नाही केले 
मुलांनी दिलेले पैसे
ते लपवून ठेवले
कपड्यांच्या घडीत
आणि माहेरी आलेल्या लेकीच्या हातावर ठेवून दिले.

माझ्या स्वप्नात येतात त्या सगळ्या बायका ज्या माझ्या मायमाऊल्या तर नव्हत्या परंतू एका काळानंतर,
माझ्या आईचा चेहरा त्यांच्याशी जुळायला लागला आहे.

मूळ हिंदी कविता
अशोक कुमार
Ashok Kumar

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
-------------------------------

स्त्री महत्ता

पुरुष होण्याचा मोह
माझ्याआत देखील उचंबळत होता
कितीतरी वेळा मी आपल्या स्त्रीत्वाला मारून पुरुष व्हावं म्हटलं
पण माणूस होण्याच्या क्रमात 
स्त्री असणं गरजेचे होते

पुरुषांनी पूल बनवले
धरणे बांधलीत
बाॅम्ब,दारूगोळा पण बनवला
आणि 
स्त्रियांनी सगळं जग झाडून काढलं

पुरुषांनी बनवलेले बाॅम्ब दारूगोळे
जेव्हा पृथ्वीवर बरसवण्यात आले
तर त्यांच्यातूनच आवाज आला
दारूगोळा बनवण्यापेक्षा अधिक गरजेचे आहे
पृथ्वीचे झाडले जाणे
अखेर दुनियेने देखील समजून 
घेतलंय
का आवश्यक आहे स्त्री म्हणून असणे.

मूळ हिंदी कविता
सरस्वती रमेश
Sarswati Ramesh

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

खूबसूरत औरतें

वे दुनिया की सबसे खूबसूरत 
औरते थीं
जो पहाड़ सी जिंदगी को
लाँघती, फलांगती हुई
किसी भी आंगन में देर तक बतियाती
जोर-ज़ोर से ठठियाती
और उदासियों को दूर धकेल देतीं.

उन्होंने छुपकर प्रेम किया
और पनिहारों, घसनियों में गुनगुनाते हुए
विरह के सबसे मीठे गीत गाए.

उन्होंने तमाम मुश्किलों को
पुआल की तरह बटोरा
और उसपर बैठकर विश्राम कर लिया.

वे जब दुःखी हुईं तो खेतों में उगे झाड़-झंखाडों को
दरातियों से कांट-छांट आयीं.

उनके हिस्से में सबसे आखिरी रोटी
सबके बाद में कपड़ा
और सबसे कम खुशियां आयीं.

उन्होंने गहने बेच बेटों को शहर भेजा
और जंगल के सबसे खूबसूरत फूल चुनकर
अपने जूडों में खोंस लिये.

उन्होंने बेटी की विदाई पर बचाये आंसूओं को
बेटों के परदेस जाने पर बहाया.

उन्होंने नहीं खर्चे बेटों के दिये पैसे
उन्हें छुपाकर रखा
कपड़ों की तहों के बीच
और पीहर आयी बेटी के हाथ में रख दिए.

मेरे सपनों में आती हैं वे सारी औरतें
जो मेरी मायें तो नहीं थीं
किंतु एक वक्त के बाद, मेरी मां का चेहरा
उनसे मिलने लग गया है.
                 -अशोक कुमार
-----------------
पुरुष बनने का मोह
मेरे भीतर भी कुलबुलाता था
कितनी ही बार मैंने अपने स्त्रीत्व को मार 
पुरुष बनना चाहा 
पर मनुष्य बनने के क्रम में 
स्त्री बने रहना जरूरी था

पुरुष ने पुल बनाए 
बांध बनाएं 
बम, बारूद भी बनाएं
और स्त्रियों ने सारा संसार बुहार दिया

पुरुष के बनाये  बम बारूद 
जब धरती पर बरसाए गए 
तो उनके भीतर से ही आवाज आई 
बारूद बनाने से ज्यादा जरूरी है
धरती का बुहारा जाना 
आखिर दुनिया ने भी समझा
क्यों जरूरी है स्त्री बने रहना 
                 -सरस्वती रमेश
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने