सत्यशोधकी अभंग!

सत्यशोधकी अभंग!


सत्यशोधकी अभंग!
🚩
पितो आहे दूध
आता म्हणे नंदी
अक्कलेची चिंधी
जळालेली

शिकलेले लोक
भक्तीचे गुलाम
करती सलाम
चमत्कारा

पुनः पून्हा लोका
बनविती मुर्ख
अंधश्रद्धा तर्क
गिळते गा

देवाच्या नावाने
सुरू आहे धंदा
दलाल मलिदा
खाती नित्य

विज्ञान दृष्टीचे
आम्हांस वावडे
चिकित्सा नावडे
श्रद्धाळूस

आताशा अक्कल
टाकली गहाण
मेंदूमध्ये शेण
भरलेले

भक्ताडपणाचे
वारे सुटलेले
शरमिंदे झाले
देव-धर्म

अंधभक्तीचे गा
फुटलेले पेव 
उजाडले गाव
विवेकाचे
🚩
-भरत यादव
@bharat yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने