मारली गेलेली माणसं

मारली गेलेली माणसं

मारली गेलेली माणसं

एक माणूस 
जागृतीबाबत बोलत होता
कट्टरतावाद्यांच्या हातून मारला गेला

एक माणूस
विज्ञानवादाबाबत बोलत होता
धर्मावलंबींच्या हातून मारला गेला

एक माणूस 
जातीपातीच्या जंजाळाबाबत बोलत होता
ब्राह्मणवाद्यांच्या हातून मारला गेला

एक माणूस
मठांबाबत प्रश्न विचारत होता
मठाधीशांच्या हातून मारला गेला

मग एके दिवशी
आणखी एक माणूस आला
त्याने मारले गेलेल्या सर्व माणसांना एकत्र केले
ग्रंथात कोरला एक एक माणूस

मारण्यात आलेली तमाम माणसं
एकाचवेळी जिवंत झाली
वातावरणात भरून राहिली

जिवंत राहाण्यासाठी
मारले गेलेल्या या माणसांना 
अवश्य वाचा
नाहीतर घुसमटत राहा
दररोज मरत राहा.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

मारे गए आदमी

एक आदमी
चेतना की बात करता था
कट्टरपंथियों के हाथ मारा गया

एक आदमी 
वैज्ञानिकता की बात करता था
धर्मावलंबियों के हाथ मारा गया

एक आदमी
वैज्ञानिकता की बात करता था
ब्राह्मणवादियों के हाथ मारा गया

एक आदमी 
मठों पर सवाल करता था
मठाधीशों के हाथ मारा गया

फिर किसी दिन
एक और आदमी आया
उसने मारे गए सभी आदमियों को
इकठ्ठा किया
पुस्तक में उकेर दिया एक-एक आदमी

मारे गए तमाम आदमी एक साथ जिंदा हो गए
फिजाओं में छा गए

जिंदा रहने के लिए
मारे गए इन आदमियों को जरूर पढ़िए
अन्यथा घुटते रहिये
रोज मरते रहिये

©वीरेंदर भाटिया
Virendar Bhatia

                       चित्रःशहीद पत्रकार रामचंद्र छत्रपति
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने