जे या वेडाचारात सामील होणार
नाहीत,
मारले जातील
आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जातील,
जे विरोधात बोलतील
जे सत्यवचन बोलतील,
मारले जातील
सहन नाही केले जाणार की कुणाचा सदरा
जर असेल 'त्यांच्या' सदर्यापेक्षा
अधिक शुभ्र,
सदर्यावर ज्यांच्या डाग नसतील,
मारले जातील
ढकलून दिले जातील कलाप्रांतातून बाहेर,
जे स्तुतीपाठक नसतील,
जे भाट नसतील,
मारले जातील
धर्माचा झेंडा उचलून जे जाणार
नाहीत मिरवणुकीत
गोळ्या घातल्या जातील त्यांना,
काफिर ठरवले जाईल
सर्वात मोठा अपराध आहे या काळात
निःशस्त्र आणि निरपराधी असणे
जे अपराधी नसतील,
मारले जातील.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे
मारे जाएँगे
कठघरे में खड़े कर दिये जाएँगे, जो विरोध में बोलेंगे
जो सच-सच बोलेंगे, मारे जाएँगे
बर्दाश्त नहीं किया जाएगा कि किसी की कमीज़ हो
'उनकी' कमीज़ से ज़्यादा सफ़ेद
कमीज़ पर जिनके दाग़ नहीं होंगे, मारे जाएँगे
धकेल दिए जाएंगे कला की दुनिया से बाहर, जो चारण नहीं
जो गुन नहीं गाएंगे, मारे जाएँगे
धर्म की ध्वजा उठाए जो नहीं जाएँगे जुलूस में
गोलियां भून डालेंगी उन्हें, काफ़िर करार दिये जाएँगे
सबसे बड़ा अपराध है इस समय
निहत्थे और निरपराधी होना
जो अपराधी नहीं होंगे
मारे जाएँगे।
©राजेश जोशी
Rajesh Joshi