पी न्युज !

पी न्युज !

एक लघुकथा

पी न्यूज!

आज रविवारची सुट्टी होती....तर मी टिव्हीवर बातम्या बघत होतो.

बातम्या बघता बघता सगळा दिवस निघून गेला.

संध्याकाळची वेळ येता येता माझं रक्त खवळून उठलं होतं...हात शिवशिवत होते...डोकं फिरलं होतं...डोळ्यात आग भडकली होती.

मी बाह्या सरसावल्या,
जवळच पडलेली हाॅकीची स्टिक उचलली आणि आपल्या मुस्लिम शेजार्‍याला मारण्यासाठी घरातून बाहेर पडलो.

तोच माझ्या बायकोने आठवण करून दिली की माझे नाव सादिक हुसैन आहे आणि मी स्वतः एक मुस्लिम आहे.

बायकोने मला पाणी पाजले,
चहा दिला आणि 
वृत्तवाहिनी बदलली.
आता मी शांतचित्ताने टिव्हीवर 
ऋषी कपूरचा सिनेमा 'दो दुने चार' पाहातो आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव

मूळ हिंदी लघुकथा

Pee News पी न्यूज

आज सन्डे की छुट्टी थी ,,,तो मैं टीवी पर न्यूज़ देख रहा था।

न्यूज़ देखते देखते पूरा दिन निकल गया

शाम आते आते मेरा ख़ून खौल चुका था ,,,भुजाएं फड़फड़ाने लगी थी ,दिमाग भन्ना चुका था, आँखों में शोले फूटने लगे थे. 

मैंने बाहें चढ़ाई , पास में पड़ी हॉकी उठाई और अपने मुसलमान पड़ोसी को मारने के लिए घर से निकल पड़ा। 

तभी मेरी बीवी ने मुझे याद दिलाया ,,,की मेरा नाम सादिक़ हुसैन है ,,और मैं खुद एक मुसलमान हूँ। 

बीवी ने मुझे पानी पिलाया , चाय दी और न्यूज़ चैनल चेंज किया। 
अब मैं शांति से टीवी पर ऋषि कपूर की फिल्म "दो दूनी चार" देख रहा हूँ।

वाचस्पति शर्मा 
©Vachspati Sharma
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने