हळूहळू क्षमाशीलता संपून जाईल
प्रेमाची आकांक्षा तर असेल पण
गरज उरणार नाही
विरघळून जाईल मिळवण्याची तळमळ
आणि गमावण्याची वेदना
संताप एकटा नसेल तो संघटित होईल
एक अफाट स्पर्धा होईल ज्यात लोक
पराभूत न होण्यासाठी नव्हे
आपल्या श्रेष्ठत्वासाठी युद्धरत राहतील,
तेव्हा येईल क्रौर्य
आधी हृदयात येईल आणि
चेहर्यावरती दिसणार नाही
मग व्यक्त होईल धर्मग्रंथांच्या व्याख्येतून,
नंतर इतिहासात आणि
त्यानंतर भविष्यवाणींमध्ये
मग ते जनतेचा आदर्श होऊन जाईल
निरर्थक ठरेल विलाप
दूसरे मरण धरून ठेवेल पहिल्या मरणापासून जन्मलेल्या अश्रूंना
शेजारी सांत्वन करणार नाही,
हत्यार देईल
तेव्हा येईल क्रौर्य आणि
इजा करणार नाही आमच्या आत्म्याला
मग ते चेहर्यावर पण दिसेल
परंतू वेगळे ओळखले जाणार नाही
सर्वत्र असतील एकसारखे चेहरे
सगळे आपापल्या पद्धतीने करत राहातील क्रौर्य
आणि सर्वांमध्ये गौरवाची भावना असेल
ते संस्कृतीप्रमाणे येईल
त्याचे कुणी विरोधक नसतील
धडपड फक्त ही असेल की कशापद्धतीने ते अधिक सभ्य आणि अधिक ऐतिहासिक ठरेल
ते भावी इतिहासाच्या लज्जेसारखे येईल
आणि
शोषून घेईल आमची अवघी करूणा
आमचा अवघा शृंगार
याची जास्त शक्यता आहे की त्याने यावे आणि दीर्घकाळपर्यंत आम्हाला
माहितच न पडावे त्याचे येणे.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
क्रूरता
धीरे धीरे क्षमाभाव समाप्त हो जाएगा
प्रेम की आकांक्षा तो होगी मगर जरूरत न रह जाएगी
झर जाएगी पाने की बेचैनी और खो देने की पीड़ा
क्रोध अकेला न होगा वह संगठित हो जाएगा
एक अनंत प्रतियोगिता होगी जिसमें लोग
पराजित न होने के लिए नहीं
अपनी श्रेष्ठता के लिए युद्धरत होंगे
तब आएगी क्रूरता
पहले हृदय में आएगी और चेहरे पर न दीखेगी
फिर घटित होगी धर्मग्रंथों की व्याख्या में
फिर इतिहास में और फिर भविष्यवाणियों में
फिर वह जनता का आदर्श हो जाएगी
निरर्थक हो जाएगा विलाप
दूसरी मृत्यु थाम लेगी पहली मृत्यु से उपजे आँसू
पड़ोसी सांत्वना नहीं एक हथियार देगा
तब आएगी क्रूरता और आहत नहीं करेगी हमारी आत्मा को
फिर वह चेहरे पर भी दिखेगी
लेकिन अलग से पहचानी न जाएगी
सब तरफ होंगे एक जैसे चेहरे
सब अपनी-अपनी तरह से कर रहे होंगे क्रूरता
और सभी में गौरव भाव होगा
वह संस्कृति की तरह आएगी
उसका कोई विरोधी न होगा
कोशिश सिर्फ यह होगी कि किस तरह वह अधिक सभ्य
और अधिक ऐतिहासिक हो
वह भावी इतिहास की लज्जा की तरह आएगी
और सोख लेगी हमारी सारी करुणा
हमारा सारा ऋंगार
यही ज्यादा संभव है कि वह आए
और लंबे समय तक हमें पता ही न चले उसका आना।
©कुमार अम्बुज
Kumar Ambuj