लिबरल हिंदू

लिबरल हिंदू

लिबरल हिंदू
/ विरेंदर भाटिया

१.
लिबरल हिंदूदेखील 
हिंदू असतो
धर्माच्या सत्त्वाला 
समजून घेणारा
'जे का रंजले..गांजले'च्या 
भावनांनी ओथंबलेला
'समधर्म समभाव' चा प्रतिनिधी

तो कुठल्याही महात्म्याविषयी
तर्कवितर्क घालू शकतो
महात्म्याशी असहमती प्रकट 
करू शकतो
परंतू म्हातार्‍या शरीरावर गोळी झाडू 
शकत नाही
हिंसेचा खेळ खेळत नसतो
लिबरल हिंदू

लिबरल हिंदू
हिंसेच्या प्रत्येक दृष्याचा निषेध 
करत असतो
पलायनाच्या प्रत्येक तांडवाच्या विरूद्ध असतो तो
पलायन धर्मांचे देणे असो
युद्धांनी लादलेले असो
विकासाचे कारण सांगून केलेले असो
वा मुर्खपणाच्या लोकबंदीचे फळ असो

लिबरल हिंदू
सर्वच धर्मांमध्ये माणुसकी धुंडाळत असतो
समानरूपाने अनैतिकतेला विरोध करत असतो
तो आपल्या धर्माच्या प्रत्येक वैशिष्ठ्यावर सार्थ अभिमान 
व्यक्त करू पाहात असतो
अनैतिकतेबाबत मात्र गप्प 
बसत नाही

तो धर्मात सुधारणा करू पाहातो
वाईट गोष्टींना अधोरेखीत करत जातो
तो वाईटाला लक्ष्य करत असतो
आणि स्वतःच वाईट म्हणवला जातो

त्याच्या विरोधामध्ये
हिंसा बघितली-दाखवली जाते
दुसर्‍या एखाद्या धर्माचा अनुनय समजला 
जातो त्याचा विरोध म्हणजे,
तसेच त्याच्या विरोधाला
मुस्लीमधार्जिणेपणा मानला जातो
त्याला डावा,सेक्युलर आणि 
'जेएनयू'वाला म्हणत वेगळ्या 
पद्धतीने रंगवले जाते की
जणूकाही लिबरल हिंदू म्हणजे
हिंदूधर्मातील बिभिषण असतो
जयचंद असतो !

लिबरल हिंदू प्रतिकार करत 
बसत नाही,
तो पुढे पुढे चालत राहातो
कट्टरतेला बाजूला सारत
अनैतिकतेला झिडकारत
लिबरल हिंदू
तमाम धर्मांमधला
सौहार्दाचा गरजेचा पूल असतो

ते
विध्वंस ज्यांचे राजकारण असते
ते सर्वात आधी
याच पूलाला तोडूनमोडून टाकतात

२.
ते 
तुटलेल्या पुलाच्या ढिगार्‍यावर उभे राहून 
थट्टामस्करी करत असतात
ढिगार्‍याखाली दबलेले 
सौहार्द,बंधुभाव,माणुसकी
चित्कारत असतात खूपदा

ते मानवताविहीन धर्माची ध्वजा फडकावत धर्मरक्षक म्हणून मिरवत असतात शतकानुशतके
धर्म कोनाड्यात पडून विव्हळत असतो,
की मानवता माझा गाभा होता
माणुसकीच माझा गाभा होता
माणुसकीशिवाय मी धर्म असू शकत नाही,ही तर एक निर्लज्ज राजकीय चलाखी आहे फक्त

३.
धर्म चलाखीला फसलेला
आपल्या दुर्दशेवर इतका रडला नसता
जितका तो अंध धर्मखोरांच्या 
अचाट अडाणचोटपणावर रडत असतो,
ज्यांनी धर्माला चलाखीसाठी वापरू दिले

४.
कट्टर हिंदू
धर्माच्या सांगाड्यासाठी धडपडत 
असतो,तर
लिबरल हिंदू
धर्माचा गाभा वाचविण्यासाठी
झगडत राहातो.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी रचना
लिबरल हिन्दू

1
लिबरल हिन्दू
भी
हिन्दू होता है
धर्म के सत्व को समझता हुआ
पीर पराई की भावना से ओत-प्रोत
समधर्म समभाव का प्रतिनिधि

वह किसी महात्मा से
तर्क कर सकता है
महात्मा से भिन्नता जाहिर कर सकता है
बूढ़े शरीर पर मगर गोली नही चला सकता
हिंसा नही खेलता लिबरल हिन्दू

लिबरल हिन्दू
हिंसा के हर मंजर की निंदा करता है
पलायन के हर तांडव के खिलाफ़ होता है
पलायन धर्मो का हासिल हो
युद्धों ने लादा हो
विकास को वजह बताया हो
या कि बेवकूफाना लोकबंदियों का प्राप्य हो

लिबरल हिन्दू
तमाम धर्मो में मनुष्यता तलाशता है
समान रूप से अनैतिकता की खिलाफत करता है
वह अपने धर्म की प्रत्येक खूबी पर 
गर्व करना चाहता है
अनौतिकताओं पर मगर खामोश नही बैठता

वह धर्मो में परिष्करण चाहता है
बुराईयां सब चिन्हित कर लेना चाहता है
वह बुराई पर मुखर होता है
और बुरा कहलाने लगता है

उसकी मुखरता में 
हिंसा देखी जाती है
दूसरे किसी धर्म की तरफदारी देखी जाती है
मुस्लिम परस्ती देखी जाती है
उसे वामी सेक्युलर और जेएनयू वाला कहकर
अलग से चरित्र चित्रण किया जाता है
कि लिबरल हिन्दू
हिन्दू धर्म का विभीषण है, जय चंद है

लिबरल हिन्दू प्रतिकार नही करता
वह आगे बढ़ता रहता है
कट्टरता को धता बताते हुए
अनैतिकताओं को झिंझोड़ते हुये

लिबरल हिन्दू 
तमाम धर्मो के  बीच
सौहार्द्र का जरूरी पुल होता है

वे
विध्वंस जिनकी राजनीति है
वे सबसे पहले
इसी पुल को तोड़ते हैं

2

वे
टूटे पुल के मलबे पर खड़े होकर अट्टहास करते हैं
मलबे के नीचे दबा सौहार्द्र, भाईचारा, मनुष्यता
चीत्कार रही होती है बेतरह

वे मनुष्यता रहित धर्म  की ध्वजा उठाये
धर्म रक्षक बने रह्ते हैं सदियों 
धर्म कोने में पड़ा चीत्कार रहा होता है
कि मनुष्यता मेरी आत्मा थी
मनुष्यता ही मेरी आत्मा थी
मनुष्यता के बिना मैं धर्म नही हूं
एक बेशर्म राजनीतिक हथकंडा हूं मात्र

3

धर्म हथकंडों में फंसा
अपनी दुर्दशा पर इतना नही रोता
जितना वह अंध धार्मिको की जहालत पर रोता है
जिन्होंने धर्म को
हथकंडा होने दिया

4
कट्टर हिन्दू
धर्म की देह के लिए लड़ता है
लिबरल हिन्दू
धर्म की आत्मा बचाने के लिए लड़ता है

©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने