एक
ऐक बये,
जे मनाला वाटेल ते नेसावंस
कारण नेसणं-नटणं,
सुंदर दिसणं
अधिकार आहे तुझा
इतर कुणाच्या नजरेत भरण्यासाठी नाही
तर
स्वतःची ओळख निर्माण होण्यासाठी
बुरसटलेल्या मानसिकतेला
धिक्कारण्यासाठी
आणि त्यांना मरेपर्यंत खिजवण्यासाठी
अखेर तुझ्या वाटेतले काटे
कोण दूर करणार आहे
तुझ्याशिवाय?
दोन
ऐक बये,
असं समजू नकोस की
तुझी पसंत फक्त तुझी असते
माहितीच होत नाही की कधी यात सामील होऊन जातो वर्षानुवर्षांचा भेदभाव आणि वर्चस्ववादी वृत्ती
त्याला पोसण्याच्या प्रक्रिया
आणि कैकदा त्याच्याशी झुंजण्यात
आणि त्याला संपवण्यात रचल्या गेल्या आपल्या पूर्वजांच्या संघर्षगाथा
इतिहास वाच,
आपल्या काही आदीमातांना
स्तन झाकण्याचा अधिकारसुद्धा
आपला जीव गमावून मिळवावा लागला होता
ओळखून घे,
वस्त्र-पोषाख-पेहराव आणि
त्याचे राजकारण
तीन
ऐक बये,
तशी तर प्रिय आहेस मला तू
कुठल्याही पेहरावात
पण जेव्हा परिधान करतेस ना जीन्स
तेव्हा मला खूप खूप चांगलं वाटतं
विचार करायला लागतो की
जात-वर्ग-लिंग यांच्या ओळखीपल्याड
या सार्वभौम पोषाखात तू
ओलांडतेयस संकुचितपणाची भिंत
निळ्या जीन्समध्ये मला तू भासतेस
कधी निळा समुद्र
कधी निळे आकाश
आणि कधी यांच्या दरम्यान
उडणारी-उंडारणारी
निळी निळी चिमणी
चार
ऐक बये,
लक्षात असू दे
सहजपणे वठत नसते रूढींची वेल
ती जीत्ती राहाते डोळ्याच्या सांदीत
मूल्यांच्या आड
परंपरेच्या ओटीत
स्वरूप बदलून आठवणींमध्ये
आणि संधी मिळताच ती
जखडून ठेवते
सर्वात आधी तुम्हां पोरींनाच
.....तेव्हा सावध बये.
पाच
ऐक बये,
तू एकदा मला विचारले होतेस की
'मुलींच्या जीन्सला खिसा का नसतो
आणि असलाच तरी खूपच लहान का?'
तर समजून घे,
अद्याप त्यांना वाटतं की तुम्हां मुलींना
गरजच नाहीये खिशाची
वा त्यात रूपये-पैसे-मोबाईल ठेवण्याची आणि
असली तरी खूपच थोडी
तर आपला दबदबा वाढवा
निर्णायकी राजकारणात या
यांना टक्कर द्या
जागा तयार करा
तेव्हाच या खेळाची सूत्रे
येतील हातात.
मराठी अनुवाद
भरत यादव
मूळ हिंदी कविता
पहनावे की राजनीति
(1)
सुनो बेटी
जो मन में आए सो पहनो
कि बनना-ठनना सुंदर दिखना
अधिकार है तुम्हारा
किसी और की नजर में नहीं बल्कि
खुद को पहचानने की खातिर
कुंठित मानसिकताओं को किलसाने
और उन्हें मर जाने तक उकसाने की खातिर
आखिर तुम्हारी राह के काँटे
कौन हटाएगा
सिवा तुम्हारे?
(2)
सुनो बेटी
ये मत समझो कि तुम्हारी पसंद सिर्फ़ तुम्हारी होती है
पता ही नहीं चलता कि कब इसमें हो जातीं हैं शामिल
वर्षों की भेदभाव और वर्चस्व की संरचनाएं
उन्हें पोसने वाली प्रक्रियाएं
और कई बार उनसे जूझने और निपटने में लगी हमारे पूर्वजों के संघर्ष की गाथाएँ
इतिहास पढ़ना
हमारी कुछ पुरखिनियों ने वक्ष ढंकने का अधिकार भी
अपनी जान गवां कर पाया था
पहचानो
कपड़े-पहनावे और इसकी राजनीति को।
(3)
सुनो बेटी
वैसे तो प्यारी हो मुझे तुम
हर रूप में
पर जब पहनती हो जींस
तो मुझे बहुत अच्छा लगता है
सोचने लगता हूँ कि वर्ग-जाति-लिंग-पहचान से परे
इस सार्वभौमिक परिधान में तुम
लांघ रही हो संकीर्णताओं की दीवार
नीले जींस में मुझे तुम लगती हो
कभी नीला समुद्र
कभी नीला आसमान
और कभी इनके बीच उड़ती-फुदकती
नीली चिड़िया।
(4)
सुनो बेटी
ध्यान रहे आसानी से नहीं सूखती रूढ़ियों की बेल
वो जिंदा रहती है आँखों की कोर में
मूल्यों की आड़ में
परंपरा की कोख में
रूप बदलकर स्मृतियों में
और मौका मिलते ही ये जकड़तीं हैं
सबसे पहले तुम लड़कियों को ही
तो सावधान।
(5)
सुनो बेटी
तुमने एक बार मुझसे पूछा था न कि-
'लड़कियों की जींस में जेब क्यों नहीं होती
और होती भी है तो बहुत छोटी क्यों?'
तो जान लो
अभी उन्हें लगता है कि तुम लोगों को जरूरत ही नहीं है जेब की
या उसमें रूपये, पैसे, मोबाइल रखने की
और है भी तो बहुत कम
तो अपना दबदबा बढ़ाओ
निर्धारण की राजनीति में आओ
इनसे टकराओ
जगह बनाओ
तभी इस खेल की बाजी आएगी हाथ।
©आलोक कुमार मिश्रा
Alok Mishra