आपण सगळे मिळून कोरस बनू !

आपण सगळे मिळून कोरस बनू !

आपण सगळे मिळून कोरस बनू !

त्यांचे लक्ष्य फक्त मुस्लीम वा 
ख्रिस्ती नाहीयेत
तुमचे वरातीमधील घोड्यावर बसणे,
तुमचे अकादमीकल यश
तुमचे ताठ मानेने उभे राहाणे
एवढेच काय तुमच्या मिशासुद्धा त्यांचे लक्ष्य बनल्या आहेत जितेंद्रपाल मेघवाल......

ते प्रेम,समता,संविधान आणि स्वाभिमान संबंधीच्या प्रत्येक शब्दावर अॅसिड फेकतील
ते आपल्या दंभाने वेडावलेत
आता बेलगाम झालेत

ते फक्त तुमचाच नाही तर आपल्या प्रत्येक मित्राचा,आप्ताचा जीव घेतील
तू तर त्यांच्या घृणेचे प्रतिक होतास.....जितेंद्रपाल

ते सध्या आपल्या चरमसीमेवर 
आहेत
पण आता विझतील
विझण्याआधी खूप फडफडतील
जाळून टाकतील सर्वकाही

संयम ठेवा
हिमंत राखा पण बोलत राहा
बलिदान जातील,
अपमान होतील मात्र बोलत राहा
पराभव होतील नाश घडतील
पण बोलत राहा

एक दिवस आपण सगळे मिळून कोरस बनूयात

जितेंद्रपाल मेघवाल...सारख्या मिशा आता देशात आणखी हजारो लाखोजण राखतील

जितेंद्रपाल मेघवाल
तुझा खून नाहीये हा
तू शहिद झालायस भावा.....जय भीम!
----------
पुढील फोटो जितेंद्रपाल मेघवाल यांचा आहे,राजस्थानमधील पाली येथील ते रहिवासी होते.
यांचा खून गावातील तथाकथित उच्च जातीच्या गुंडांनी केवळ यासाठी केला की यांनी मिशी ठेवली होती.
मिशा या भारतात आत्मसन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या प्रतिक मानल्या जातात,एखादा दलित व्यक्ती जर मिशी ठेवत असेल तर तथाकथित उच्चवर्णियांना ते सहन होत नाही,भारतात दलित माणसाच्या जीवाची काहीही किंमत नाही हेच खरे.

दीपक कबीर
आणि 
संदीप यादव
यांच्या मूळ हिंदी पोस्टवरून
संपादित आणि अनुवादीत

( ही कविता नाही हे एक गंभीर टिपण आहे )
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने