सत्यशोधकी अभंग !

सत्यशोधकी अभंग !

सत्यशोधकी अभंग!
🚩
धर्मांध भैताड
पुन्हा पचकले
दात विचकले
भक्ताडांनी

सोडतो घृणेची
पिचकारी घाण
सनातनी बाण
विषयुक्त

संभाजी राजेंचा
आलासे पुळका
बेगडी हुंदका
सुसरीला

सर्वपक्षीयांचे
सामुहिक पाप
सनातनी साप
पोसलेला

मुस्लिमद्वेषाचा
एकमेव फंडा
संघाचा अजेंडा
राबवितो

कष्टकरी जन
बेकार तरूण
जाती बा शरण
कपटाला

अस्मितेच्या नावे
फावणार यांचे
सोने गरिबांचे
लुबाडले
 
गाडलेली मढी
काढी उकरून
क्रोधाचे सिंचन
वर्तमानी

स्वातंत्र्य प्राप्तीत
शून्य योगदान
तेच शहाणपण
शिकवती

छद्म राष्ट्रवादी
फोफावले खूप
त्यांचे खरे रूप
ओळखावे

मराठी मुलूख
द्वेषाने जर्जर
चित्र मनोहर
नाही मुळी

शिवराय शंभू
सह्याद्रीचे राणा
मराठ्यांचा बाणा
सर्वकाळ
🚩
     -भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने