भगतने लावली होती
जी झाडं
बंदूकांची
बालपणी-
त्याचे आता जंगल झाले असेल.
त्या जंगलास
हुडकून काढेल
जर कुणी पिडीत
एखाद्या दिवशी
जगभरातल्या
सत्ताधार्यांनों-हुकूमशहांनो
तुमचं काय होईल,मग
त्या दिवशी?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
भगत ने लगाए थे
जो पेड़
बंदूकों के
बचपन में-
वो अब जंगल हो चुका होगा।
उस जंगल को
जो ढूंढ लेगा
गर मज़लूम किसी रोज़
दुनिया के हुक्मरानों-तानाशाहों
तुम्हारा क्या होगा
उस रोज?
©किताबगंज
Kitabganj