आवडत्या कवीचे पुस्तक

आवडत्या कवीचे पुस्तक

आवडत्या कवीचे पुस्तक

आवडत्या कवीचे पुस्तक
नीटनेटक्या,सजलेल्या
कपाटात असत नाही

बाहेरच असते
धुळ,ऊन,वारा,पाणी,आकाश
यांच्या जवळपास

नेहमी त्याची
गरज पडत असते
त्यात जागोजागी
खूणा केलेल्या असतात
तळाशी काही अक्षरे
लिहिलेली

अंधुकसे मुखपृष्ठ
पाने दुमडलेली-मुडपलेली
जीर्ण
पण सुंदर

आसवांनी भिजलेली
तरिही कुठल्याशा
प्रवासाच्या सज्जतेत
हसणारी
उशाशी ठेवलेली कविता
जणू सांगते आहेः
पाहा,मी जिथून आले आहे
तिथेच जायचे आहे मला

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

प्रिय कवि की किताब

प्रिय कवि की किताब
साफ़-सुथरी, सजी-धजी
अलमारी में नहीं रहती

बाहर ही रहती है
धूल, धूप, हवा, पानी,
आसमान के आसपास 

अक्सर उसकी 
ज़रूरत पड़ती है 
उसमें जगह-जगह 
निशान लगे होते हैं
हाशियों पर कुछ अक्षर
लिखे हुए

धूमिल सा कवर
पन्ने तुड़े-मुड़े 
जर्जर 
मगर सुंदर 

आँसुओं से भीगी
फिर भी किसी
सफ़र की तैयारी में 
मुस्कराती 
सिरहाने रखी कविता
गोया कहती हुई :
देखो, मैं जहाँ से आयी हूँ
वहीं जाना है मुझे

©पंकज चतुर्वेदी
Pankaj Chaturvedi

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने