आता तर सगळं योग्य आहे

आता तर सगळं योग्य आहे

आता तर सगळं योग्य आहे

जे झालं ते योग्य होतं
तू जे केलंस योग्य होतं
तू जे करशील ते योग्यच असेल
जशी फाळणी योग्य होती
भोगी लोभी सुद्धा योग्य आहेत
बाबरी मशिदीचा विध्वंस योग्य होता
गोध्रामध्ये जे घडलं योग्य होतं
तुझी घृणा योग्यच आहे
तुझी निवड योग्य आहे
तुझी जीभ खरी आहे
तुझा हिंदुत्ववाद योग्य आहे

तू इतका निर्मळ वैरी आहेस की
आता तर सगळं योग्य आहे
न्यायालय
लोकशाही
भाट
विदूषक
निवडणुका
तुझा तिरस्कार योग्य आहे कारण 
त्यावर तू कुठलाही मुखवटा धारण 
केलेला नाहीयेस
आम्हालाही खात्री पटलीय 
आता
येणारच होता एक दिवस की
कुठला बंधूभाव नव्हता कधी इथे
ना कुठली गंगाजमुनी संस्कृती होती
ही सगळी तर वाडवडिलांच्या समाध्यांवरून 
उडणारी धूळ होती,
जी खाली बसलीय
तुझ्या चित्रपटातली,
नाटकातली आणि 
कथांमधली दृष्ये याची साक्ष देतायत की 
सगळं योग्य आहे इथे 
म्हणून आता कुठल्या प्रस्तावाची गरज उरलेली नाहीये

घबाडच मिळालं जणूकाही,
तू पंच्याहत्तर वर्षांचा भ्रम दूर 
केलास आमचा
म्हणून आता सर्वकाही योग्य आहे !
आणि मी हा विचार करून निर्धास्त आहे की 
या रणरणत्या दुपारी 
पातीचा कांदा आणि भाकरी खाऊन 
मला अखेरीस कदाचित झोप लागेल.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

अब तो सब सही है

जो हुआ वो सही था
तुमने जो किया सही था 
तुम जो करोगे वो सही ही होगा
जैसे बँटवारा सही था 
भोगी लोभी भी सही हैं
बाबरी मस्जिद विध्वंस सही था 
गोधरा में जो हुआ सही था
तुम्हारी घृणा सही ही है 
तुम्हारा चुनाव सही है 
तुम्हारी ज़ुबान सच्ची है
तुम्हारा हिंदूवाद सही है 

तुम इतने नफ़ीस दुश्मन हो कि
अब तो सब सही है
न्यायालय 
लोकतंत्र 
भाण्ड 
मसख़रे 
चुनाव 
तुम्हारी नफ़रत सही है क्योंकि उसपे 
तुमने कोई मुखौटा नहीं ओढ़ा
हमें भी यक़ीन आ ही गया अब 
आना ही था एक दिन कि
कोई भाईचारा नहीं था कभी यहाँ 
न कोई गंगा-जमुनी तहज़ीब थी 
ये सब तो बुज़ुर्गों की क़ब्रों से उड़ती धूल थी 
जो बैठ गयी 
तुम्हारे फिल्मों, नाटकों और कथाओं के दृश्य 
इस बात की गवाही देते हैं कि सब सही है यहाँ 
इसलिए अब किसी तमहीद की ज़रूरत नहीं रही

ग़नीमत है तुमने पचहत्तर सालों का भ्रम दूर 
कर दिया हमारा
इसलिए अब सब सही है !
और मैं ये सोचकर आश्वस्त हूँ कि इस गर्मी की दुपहर 
कच्चे प्याज़ और रोटी खाकर
मुझे आख़िरकार नींद आ जायेगी। 

©अदनान कफिल दरवेश
Adnan Kafeel Darwesh 

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने