हुंदके

हुंदके

हुंदके

थिएटराच्या आत हुंदके होते आणि
थिएटराबाहेर उन्मादी घोषणांसह
धुमधडाक्यात साजरा होत होता हुंदक्यांचा उत्सव.

थिएटरांमधील हुंदक्यांनी डोळ्यात अश्रू 
आणि आग भरली आहे
अंधूक डोळे सत्य पाहू शकत नाहीत
आणि जळते डोळे फक्त घृणा करू शकतात.

काही काहीच हुंदक्यांना प्राप्त होत असतो
साजरे होण्याचा सन्मान
लाखो करोडो हुंदके अज्ञात दफन होत असतात.

स्मशानसाधनेचा तज्ज्ञ असलेल्या आमच्या
अघोरी सत्ताधीशाने साध्य केली आहेत कितीतरी प्रेतं
सत्ताधीशाला जेव्हा जेव्हा गरज पडते ही प्रेतं दफन होऊन गेलेल्या हुंदक्यांना धरती चिरून घेऊन येतात मग 
डमरू वाजवत वाजवत डुलत असतो सत्ताधीश.

सत्ताधीशाला वाटते आहे की केवळ थिएटरांपर्यंतच 
मर्यादीत राहू नये या लाव्ह्यासमान उकळणार्‍या हुंदक्यांनी 
यांनी पोहोचले पाहिजे गल्लीमोहल्ले,चौकाचौकात
सत्ताधारी हुंदक्यांचा चलाख व्यापारी आहे
हुंदक्यांच्या खरेदी-विक्रीमुळेच तो सत्ताधीश आहे.

सत्ताधीशाच्या हुंदक्यांपासून सावध असा !
सत्ताधीश जेव्हाही मुसमुसतो
बैलाच्या शिंगांवर पेललेल्या पृथ्वीला उलथवून टाकतो
डळमळत्या पृथ्वीला पुन्हा शिंगांवर पेलेपर्यंत 
प्रेतांनी भरून गेलेली असतात स्मशानं आणि कब्रस्तानं
सत्ताधीशाच्या साधनेचा हा सर्वात योग्य काळ असतो.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

सिसकियाँ
1.

थियेटर के भीतर सिसकियाँ थीं
और थियेटर के बाहर उन्मादी नारों के साथ
धूमधाम से मन रहा था सिसकियों का जश्न।

2.

थियेटरों की सिसकियों ने
आँखों में आँसू और आग भरी 
धुंधली आँखें सच नहीं देख पातीं
और जलती आँखें सिर्फ़ घृणा कर सकती हैं।

3.

कुछ ही सिसकियों को
हासिल होता है जश्न का गौरव
लाखों करोड़ों सिसकियाँ
गुमनाम दफ़न हो जाती हैं।

4.

श्मशान साधना के अभ्यस्त
हमारे अघोरी हाकिम ने
साध लिए हैं कितने ही प्रेत
हाकिम को जब-जब ज़रूरत होती है
ये प्रेत दफ़न हो चुकी सिसकियों को
धरती फाड़ कर निकाल लाते हैं
फिर डमरू बजाते हुए झूमता है हाकिम।

5.

हाकिम चाहता है कि सिर्फ़ थियेटर तक
महदूद न रहें लावे सी धधकती सिसकियाँ
इन्हें पहुँचना चाहिए मोहल्लों, चौपालों तक
हाकिम सिसकियों का चतुर व्यापारी है
सिसकियों की ख़रीद-बेच से ही वह हाकिम है।

6.

हाकिम की सिसकियों से सावधान!
हाकिम जब भी सिसकता है
बैल सींगों पर टिकी धरती को उछाल देता है
डगमगाती धरती के फिर से सींगों पर टिकने तक
लाशों से भर चुके होते हैं श्मशान और क़ब्रिस्तान
हाकिम की साधना का यह सबसे सही समय होता है।

©हरभगवान चावला
Harbhagwan Chawala
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने