बुद्धीविभ्रम

बुद्धीविभ्रम

बुद्धीविभ्रम

त्याने चिंता व्यक्त केली,
धर्म आणि जातीच्या नावावर
मारले जाताहेत लोक

उत्तर आले,
राग आहे,असाच बाहेर पडणार
परधर्मीय करतात बलात्कार
आणि तथाकथित हलक्या जाती 
फूस लावून
पळवतात आमच्या लेकी-बहिणींना

माझ्या स्मृतीतून वर आले
कैक लिबलिबीत हात
डोके आणि पाठीवरून घसरत
मांड्यांच्या दिशेने सरकणारे

त्यांच्यातला कुणीही परधर्मीय नव्हता

लग्नात गोत्राचे बंधन होते,
पण बलात्कारासाठी गोत्राचा कुठलाही नियम नव्हता

उच्च नैतिकतेचा आदर्श आपल्या मिशींवर ठेवणारे

चांगले चारित्र्य आपल्या शेंडीला बांधणारे

आणि संस्कार-मर्यादेची बाब आपल्या 
मोळीत गुंडाळणारे
बायकांना बाहेर जाण्यापासून रोखत राहिले

जेव्हा महिला घरातच सर्वात अधिक असुरक्षित होत्या

जर आपण स्त्रियांचे अनुभव
आकड्यांमध्ये नोंदण्यास नाकारत नसाल तर आपणांस आढळेल की

ब्राह्मण स्त्रियांवर बलात्कार सर्वात जास्त ब्राह्मण पुरूषांनीच केलेत

क्षत्रिय स्त्रियांवर बलात्कार सर्वात जास्त 
क्षत्रिय पुरूषांनीच 

आणि मुस्लीम स्त्रियांवर बलात्कार सर्वात 
जास्त मुस्लीम पुरूषांनीच

परंतू दलित स्त्रीच्या बलात्कारात
जात-पात आणि स्पृश्य-अस्पृश्यता
न मानण्यात सगळेच समान प्रगतीशील राहिले आहेत

खरी गोष्ट ही आहे की
कुणाच्या मर्जीविरूद्ध 
शरीराला ओरबाडणे-चिरडणे
कधी गुन्हा राहिलाच नाही

अखंड धार्मिक लोकांसाठी

खरा अपराध ठरत आलाय
तथाकथित हलक्या जातीचे किंवा परधर्मीय असणे

जर असे नसते तर
घरातल्या गोष्टी घरातल्या तळघरात
कधी दडपल्या गेल्या नसत्या

जर असे नसते तर
परिचित बलात्कार्‍याशी
नातेसंबंध कधी निभावला गेला नसता

जर असे नसते झाले
तर लग्नानंतरदेखील बलात्कार
बलात्कारच ठरला असता,
प्रेम म्हणवले गेले नसते

आणि जर असे नसते झाले
तर कायद्याच्या उंच चौकटीवर उभे राहून कुण्या बलात्कार्‍याने घातला नसता वरमालेचा फास आपल्याच सावजाच्या गळ्यात

जर खरोखरच असे नसते झाले
सहमतीचा मान ठेऊन तर
प्रेम करणार्‍यांची प्रेतं
लोंबकळली नसती झाडांवर

आपण तिरस्कार आणि बलात्कार यांना संस्काराप्रमाणे आपल्या काॅलरवर आणि अस्तिन्यांमध्ये 
पोसणारे कर्मठ धार्मिक 
आणि पवित्र लोक आहोत

जे प्रेमाच्या फुलांच्या निव्वळ सुगंधानेदेखील 
बुद्धीविभ्रमात निघून जात असतात.
-------
delirium - बुद्धीविभ्रम

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

डेलिरियम

उसने चिंता जताई
धर्म और जाति के नाम पर
मारे जा रहे हैं लोग

जवाब आया
गुस्सा है,ऐसे ही निकलेगा
विधर्मी करते हैं बलात्कार
और कुजातियाँ बहका ले जाती हैं
हमारी बहन बेटियों को

मेरी स्मृतियों में उभर आए
कई लिजलिजे हाथ
सिर और पीठ से फिसलकर
जांघों की ओर बढ़ते हुए

उनमें से कोई भी विधर्मी नहीं था

विवाह में गोत्र का बंधन था
मगर बलात्कार के लिए गोत्र का कोई नियम नहीं था

उच्च नैतिकता के आदर्श अपनी मूछों पर रखने वाले

उत्तम चरित्र को अपनी चोटियों से बांधने वाले 

और संस्कार और मर्यादा की बात अपनी अंटियों में गांठने वाले
औरतों को बाहर जाने से रोकते रहे

जबकि महिलाएं घर में ही सबसे ज़्यादा असुरक्षित थीं

अगर आप स्त्रियों के अनुभवों को
आंकड़ों में दर्ज करने से इनकार न करें
तो आप पाएंगे कि

ब्राह्मण स्त्रियों का बलात्कार सबसे अधिक ब्राह्मण पुरुषों ने ही किया

क्षत्रिय स्त्रियों का बलात्कार सबसे अधिक क्षत्रिय पुरुषों ने

और मुसलमान स्त्रियों का बलात्कार सबसे अधिक मुसलमान पुरुषों ने

लेकिन दलित स्त्री के बलात्कार में
जात-पात और छुआ छूत छोड़ने में
सब बराबर प्रगतिवादी रहे

असल बात ये है कि
किसी की मर्ज़ी के विरुद्ध
देह को नोंचना-रौंदना
कभी अपराध रहा ही नहीं

अखंड धार्मिक लोगों के लिए

असल अपराध रहा
कुजातीय और विधर्मी होना

अगर ऐसा नहीं होता
तो घर की बातें घर के तहखानों में
कभी न दबाई  जाती

अगर ऐसा नहीं होता 
तो परिचित बलात्कारी से रिश्तेदारी 
कभी न निभाई जाती

अगर ऐसा नहीं होता 
तो विवाह के बाद भी बलात्कार 
बलात्कार ही रहता, प्रेम नहीं कहलाता

और अगर ऐसा नहीं होता
तो कानून की ऊंची चौखट पर खड़े होकर
कोई बलात्कारी नहीं डाल रहा होता वरमाला का फंदा
अपनी ही शिकार के गले में

अगर वाकई ऐसा नहीं होता
सहमति का मान रखकर
प्रेम करने वालों की लाशें
न झूल रही होती पेड़ों पर

हम नफ़रत और बलात्कार को संस्कार की तरह अपने कालरों 
और कलफ़दार आस्तीनों में पालने वाले 
घने धार्मिक और पवित्र लोग हैं

जो प्रेम के फूलों की गंध मात्र से डेलिरियम में चले जाते हैं

©कविता कादंबरी
Kavita Kadambari 

चित्र साभारः
Marta sketch by nailone 
on DeviantArt
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने