कवितांचा बाप,त्याचा
काय सांगावा रूबाब
विटेवरल्या देवालाही
थेट विचारी जबाब
मांडियेला गाथेतून
बोली भाषेचा सोहळा
दिले फेकून सोवळे
फुले मराठीचा मळा
कुणब्यांच्या जखमांना
काळजाने गोंजारतो
राबणार्यांच्या दुःखाला
ओवीओवीत गुंफतो
त्याच्या शब्दांच्या सिंचने
नव्या काव्याला उभारी
त्याच्या अभंगाच्या बळे
डूले प्रतिभा शिवारी
-भरत यादव
Bharat Yadav