एक काश्मिरी कविता

एक काश्मिरी कविता

एक काश्मिरी कविता
🍁🍁🍁
कर्फ्यू

कर्फ्यू आहे काळजीपूर्वक राहा
पाणी कमी सांडा,मीठ कमी खा

केशराचाही चहा बनवला जाऊ शकतो
पिठात मीठ घालून पाणी उकळवूनसुध्दा 
रोटी खाल्ली जाऊ शकते
तांदळाच्या पेजेला फोडणी देऊनदेखील
एकवेळची भाजी चालवली जाऊ शकते

दोन कुटुंबांनी एकाच चूलीवर स्वयंपाक करावा
एकत्रित सरपण जाळा,
एकत्र बसून जेवा
असे केल्याने बरकत राहिल
तांदळाचे पिंप आणि तेलाची बुधली
जास्त दिवस चालू शकेल

आईची औषधं संपली असतील तर
पाण्यात हळद मिसळून दिल्याने बरं वाटेल
बाबांच्या गुडघ्यांना कोमट तूप लावा,
मुलांनी जर फिरण्यासाठी हट्ट धरला तर 
त्यांना बाल्कनीमध्ये खांद्यावर फिरवून आणा

खिडकीतून शेजार्‍याशी संवाद साधत राहा
काहीजण घाबरट असतात,
दिलासा देत राहा
उसनवारी करण्यात लाज ती कसली?
भीतीच्या सावटानंतर शांतताकाळात
परतफेड करत राहा

एखाद्या नाक्यावर पोलिसांनी विचारलं
तर,
हो साहेब,
नाही साहेब टाईपची उत्तरं देणे
आधार,मतदार ओळखपत्र,
लायसन्स खिशात ठेवणे

अजून बर्‍याच गोष्टी आहेत
ज्या तूम्हांला शिकवायच्या आहेत
काही दिवसांचीच तर बाब आहे
आपल्याला कुठे आमच्यासारखे
कर्फ्यूत आयुष्य काढायचे आहे?

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता 
हाज़रा फ़ैया 
Hajra Faiya
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने