प्रत्येक गोष्टींमागे देव ना असावा !

प्रत्येक गोष्टींमागे देव ना असावा !

प्रत्येक गोष्टीमागे देव ना असावा !

आपल्या निरोगी शरीराला
जर नाही म्हणू
की देवाची कृपा आहे
तर ते याला आमचा 
अहंकार मानणार.

आपली सुंदर पत्नी आणि मुलांकरिता
आम्ही जर नाही म्हणालो
हा तर थोरामोठ्यांंचा आशिर्वाद
तर ते आम्हाला कृतघ्न ठरवणार.

जर आम्ही म्हणू
खूप कष्टाने उभारलंय हे घर
तर ते विनम्रपूर्वक म्हणणार
भावा,कर्माचे काय
हे तर आपल्या पुण्याचेच फळ आहे

भरपूर पैसे देऊन
मिळवलेल्या नोकरीला
ते म्हणणार 'प्रभुची माया..'
आणि
उपचाराविना जीव गमावलेल्या वृद्धेस
'जशी इच्छा हरीची..'

ते प्रत्येक क्षणी आम्हाला समजावणार
तुम्ही काय घेऊन आला होता?
काय घेऊन जाणार आहात?
काय आहे तुमचे? 
आणि तुम्ही केलंय तरी काय?

जणू काही व्यर्थच आलोयत आम्ही पृथ्वीवर आणि काही आम्ही केलेय
ते काही केलेलेच नाही!

जणू पृथ्वी
ना आमची कधी होती,
ना कधी असेल
पडून राहू आम्ही असेच
देवाच्या पायदळी.

आम्ही जावू त्यावेळीही
आमच्या उशाला
ते वाचत बसतील तेच महाग्रंथ
जे ते समजावू पाहात होते आयुष्यभर
आणि जिवंतपणी,
आम्ही कधी नाही समजू शकलो ज्यांना!

गरुडपुराणाचे पारायण करणार्‍या
या लोकांना कोण समजावणार
की
मोक्षाची अपेक्षा नाही आम्हाला
बस्स,आम्हाला तर जायचं आहे
अशा जगात
जिथे प्रत्येक गोष्टींच्यामागे
देव ना असावा!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

हर बात के पीछे ईश्वर ना हो

अपनी स्वस्थ काया को
यदि नहीं कहेंगे
कि ईश्वर की कृपा है
तो वह कहेंगे इसे हमारा अहंकार

अपनी सुन्दर पत्नी और बच्चों के लिए
यदि हम नहीं कहेंगे
कि 
सब है बुज़ुर्गों का आशीर्वाद 
तो वे हमें कृतघ्न ठहराएंगे

यदि हम कहेंगे
बड़ी मशक्कत के बाद बना पाये यह मकान
तो वे बड़ी आज़िजी से बोलेंगे
भाई , कर्मों का क्या
ये सब है आपके पुण्यों का फल ही

ढेर सारा पैसा देकर 
कबाड़ी गई नौकरी को
वे बतलायेंगे प्रभु की माया 
और
इलाज के अभाव में दम तोड़ चुकी वृद्धा को
जैसी हरि इच्छा 

वे हर क्षण हमें समझायेंगे 
तुम क्या लेकर आये थे 
क्या लेकर जाओगे
क्या है तुम्हारा और तुमने किया ही क्या है 

जैसे व्यर्थ ही आये हों हम पृथ्वी पर
और जो कुछ हमने किया
वो कुछ किया ही नहीं

जैसे पृथ्वी 
ना हमारी कभी थी , ना कभी  होगी 
पड़े रहेंगे हम यों ही 
ईश्वर के पैरों तले

हमारे जाने के समय भी 
हमारे सिरहाने बैठ कर 
वे पढ़ेंगे वही महाग्रंथ
जो वे समझाना चाहते थे जीवन भर
और जीते जी , हम कभी नहीं समझ पाये जिन्हें !

गरुण पुराण का पाठ करते हुए 
इन लोगों को कौन समझायेगा 
कि
मोक्ष की कामना नहीं हमें
बस , हम तो जाना चाहते हैं
ऐसी दुनिया में 
जहाँ हर बात के पीछे , ईश्वर ना हो !

 ©राजहंस सेठ 
Rajhans Seth


.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने