आम्ही माणसं !

आम्ही माणसं !

आम्ही माणसं!

जातींच्याविरोधात लिहिताच
सर्वात आधी विचारली गेली जात...
धर्मावर वार करताच
कुणी जिहादी तर 
कुणी काफिर म्हणाले

मी विचारतो की
पृथ्वीच्या पोटावर आडव्या तिडव्या रेघांनी 
जाती,वंश,धर्म यांवर आधारीत
विभागून टाकण्यात आलेल्या इतक्या सार्‍या देशांमध्ये आमचा देश कोणता आहे?
आमचे घर कुठे आहे?
आम्ही कुठल्या देशाचे नागरीक आहोत?
जाती-धर्म-वंश वगैरेंनी 
का हिसकावून घेतले असेल आमच्याकडून
आमचे माणूस असण्याचे ओळखपत्र?

आम्ही विचारतोय की 
आम्ही कुठे जावे?
ज्यूंनां स्विकारणारा इस्त्राईल,
मुस्लीमांवर संकट येताच उभी राहाणारी आखातातली राष्ट्रं आणि भारतासारखी धर्मनिरपेक्ष राष्ट्रं,
ख्रिस्तीजनांना धक्का पोहोचताच नाराज होणारा युरोप,
हिंदूंसाठीही धडधडत असतं भारताचं हृदय.....

आम्ही जे अवघ्या पृथ्वीला घर मानतो
आम्हाला कोण स्विकारेल?
हे किती कठोर आणि बिभत्स सत्य आहे की आम्हां माणसांच्यासाठी बनलेल्या या पृथ्वीवर फक्त आम्ही माणसेच बेघर आहोत,
आश्रयहीन आहोत....

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता
जाति के विरोध में लिखते ही
सबसे पहले पूछी गई जाति...
धर्म पर चोट करते ही
किसी ने ज़िहादी तो किसी ने काफ़िर कहा

हम पूछते हैं कि पृथ्वी के उदर पर आड़ी-टेढ़ी रेखाओं से
जाति,नस्ल,धर्म के आधार पर काटकर बनाये गए 
इतने ढ़ेर सारे देशों में हमारा देश कौन सा है?
हमारा घर कहाँ है?
हम किस देश के नागरिक हैं?
जाति/धर्म/नस्ल ने हमसे क्यों छीन लिया
हमारे मनुष्य होने का आइडेंटिटी-कार्ड ?

हम पूछते हैं कि हम कहाँ जायें?
यहूदियों को अपना लेता है इस्राइल,
मुस्लिमों पर आँच आते ही खड़े हो जाते है खाड़ी या भारत जैसे धर्मनिपेक्ष राष्ट्र,
ईसाइयों को छूते ही बिफ़र पड़ता है यूरोप,
हिंदुओं के लिए भी धड़कता है भारत का हृदय....

हम जो पूरी पृथ्वी को घर मानते हैं,
भला हमें कौन अपनाएगा?
यह कितना कठोर और वीभत्स सच है कि
हम मनुष्यों के निमित्त बनी इस पृथ्वी पर
सिर्फ़ हम मनुष्य ही बेघर हैं,बेसहारा हैं...

©Ajay Durdney
अजय 'दुर्ज्ञेय' 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने