गांधीजींचे विव्हळणे !

गांधीजींचे विव्हळणे !

गांधीजींचे विव्हळणे !

आज सकाळी प्रार्थनाभवनच्या आत
रक्तबंबाळ गांधीजी दिसले
विव्हळत ते बोलले-

'माझ्या बरगडीत अडकलेली ही गोडसेची गोळी काढून टाक
खूपच त्रास होतोय!'

मी पाहिलं
हाडात अडकली होती एक गोळी गंजलेली
आजूबाजूला त्यांच्या विचाराचे कुणी नव्हते
ना नेहरू,पटेल,कस्तुरबा 
ना महादेव भाई
हजारो गोडशांनी घेरले गेले होते गांधीजी
गर्दीत कुठल्या गोडसेला
स्फुंदणार्‍या गांधीजींची दया 
आली नाही!

मी भ्यालेला त्यांना तिथेच सोडून
निघालो पुढे
गांधीजींकरिता गोडसेच्या तोंडाला कोण लागणार?

घरी पोहोचलो तर एक गोळी
माझ्या बरगडीत घुसलेली मला आढळली
गांधीजींच्या रक्ताने भिजलेले मी 
माझे मला पाहिले!
बाहेर रस्त्यावर, कार्यालयात, शेतारानात आणि घराघरात लाखो गोडसे गांधीजींचा जयजयकार करत होते आणि विचारत होते एकमेंकांना
गांधीला कुणी मारले?

विव्हळताहेत गांधीजी
त्यांच्या बरगडीत घुसलीय गोळी
देश बोलतोय गोडसेची बोली!

माझ्या बरगडीत घुसलेल्या गोळीमुळे
ठिबकत आहे अविरत रक्त
माझ्या यातनेने जखमी मी
गांधीजींना विसरू पाहातोय
का लक्षात ठेऊ त्यांचे असणे
त्यांची बरगडी त्यांचा खून!

पुनःपून्हा स्वतःला विचारतोय
कोण गांधीजी?
कुणी उत्तर देत नाहीये भाऊ
फक्त दिशादिशातून गांधीजींच्या
जयजयकाराने घेरलेले विव्हळणे 
ऐकू येत आहे!

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

गांधी की कराह!

आज सुबह प्रार्थना भवन के अंदर
लहू लुहान गांधी मिले
कराहते हुए बोले -

"मेरी पसली में अटकी ये गोडसे की गोली
निकाल दो
बहुत तकलीफ में हूं!"

मैंने देखा हड्डी में अटकी थी एक गोली जंग खाई
आस पास उनके विचार वाला कोई ना था
ना नेहरू, पटेल, कस्तूरबा ना महादेव भाई
हजारों गोडसे से घिरे थे गांधी
भीड़ में किसी गोडसे को 
बिलखते गांधी पर ना दया आई!

मैं डरा हुआ उनको वहीं छोड़ कर 
बढ़ गया आगे
गांधी के लिए गोडसे के मुंह कौन लागे?

घर पहुंच कर एक गोली मैंने
अपनी पसली में धंसी पाया
गांधी के लहू से भीगा हुआ खुद को पाया!
बाहर सड़क दफ्तर खलिहानों और मकानों में
लाखों गोडसे लगा रहे थे गांधी का जयकारा
और पूछते थे एक दूसरे से
गांधी को किसने मारा?

कराह रहे हैं गांधी 
उनकी पसली में धंसी है गोली
देश बोल रहा है गोडसे की बोली!

अपनी पसली में धंसी गोली से 
रिस रहा है निरंतर रक्त
अपनी यातना से आहत
मैं गांधी को भूल जाना चाहता हूं
क्यों याद रखूं उनका होना
उनकी पसली उनकी हत्या!

बार बार खुद से पूछता हूं कौन गांधी?
कोई उत्तर नहीं देता भाई
बस दिशा दिशा से गांधी की 
जयकार से घिरी कराह 
देती है सुनाई!
🍁
©बोधिसत्व
Bodhisatva

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने