सेक्युलर असणे
मर्यादाशील असणे होय
इतरांच्या अस्तित्वाचा
स्विकार करण्याच्या
योग्यतेचे असणे होय
भाषा,धर्म,रंग,लिंग-भेद
जाती,स्पृश्य-अस्पृश्यतेच्यापल्याड पाहाण्याची समजूत विकसित होणे
म्हणजे
सेक्युलर असणे होय
घरातून बाहेर पडलो तर दहा-दहा कोसांवर बदलत जातो भाषेचा लहेजा,
पोशाखाची पद्धती,
खाण्यापिण्याची रीत
सकलांना स्विकारण्याच्या संस्कृतीचे असणे सेक्युलर असणे होय
एका प्रांतातून दूसर्या प्रांतांकडे होणार्या प्रवासात बदलत असते भाषा
संस्कृती
आराध्य
सर्वांप्रती सन्मान -आदर देण्याची
परंपरा-संस्कार म्हणजे सेक्युलर असणे होय
सेक्युलर म्हणजे
विविधतेत राष्ट्रवाद पाहाण्याची दृष्टी असणे होय
विविधतेने नटलेल्या या प्रिय देशात
सेक्युलर असण्याचा अर्थ
वैश्विक अंतर्दृष्टीने परिपूर्ण असलेला
संपूर्ण मानव असणे होय
माणूस असण्याची एकमेव पात्रता
सेक्युलर असणे आहे
ते
जे सेक्युलर नाहीयेत
मानवी खोळामध्ये चालते फिरते मानवी बाॅम्ब आहेत
ज्या बुद्धीबळी आक्रमकांनी
शिवी बनवलाय हा शब्द
ते सगळे
याच बुद्धीबळी पटावर
मारले जातील एक दिवस.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
कौन होता है सेक्युलर
सेक्युलर होना
अदब का होना है
दूसरे के अस्तिव को
स्वीकार करने की
लियाकत का होना है
भाषा, मजहब, रंग, लिंग-भेद
जाति, छूत-अछूत से आगे देखने की समझ का विकसित होना
सेक्युलर होना है
घर से निकलो तो
दस कोस में बदल जाता है
बोली का अदब
पहनावे का तरीका
खान पान का ढंग
सबको अंगीकार करने की तहज़ीब का होना
सेक्युलर होना है
प्रांत से प्रान्त की यात्रा में
बदल जाती है
भाषा
संस्कृति
आराध्य,
सबको सम्मान देने की रवायत
सेक्युलर होना है
सेक्युलर
विभिन्नताओं में राष्ट्रवाद देखने की नजर का होना है
विविधताओ के प्यारे मुल्क में
सेक्युलर होने का अर्थ
वैश्विक अंतर्दृष्टि से परिपूर्ण
सम्पूर्ण मानव होना है
इंसान होने की एकमात्र योग्यता
सेक्युलर होना है
वे
जो सेक्युलर नही हैं
इंसानी खोल में चलते फिरते मानव बम्ब हैं
जिन शतरंजी आक्रांताओं ने
गाली बना दिया है ये शब्द
वे सभी
इसी शतरंज की बिसात पर
मारे जाएंगे एक दिन
©वीरेंदर भाटिया
virendar bhatia