ए शर्मिला !
हे काय! तुझ्या डोळ्यात अश्रू?
पण अश्रू तर जिवंत लोकांचेच निघत असतात !
अर्थात तू जिवंत आहेस?
तुला तर खूप पुर्वीच मारण्यात आले होते!
जेव्हा तू शर्मिलाची प्रतिवाद आणि विद्रोहाची देवी ! आर्यन लेडी बनवली गेली होती!
जसे मंदिरांमध्ये देवी-देवतांना दाखवला जातो प्रसाद
तुलाही दाखवला जायचा प्रसाद
केली जायची देखरेख
ठेवला जायचा पहारा कारण कुणी चोरी करू नये देवीची किंवा मग
देवी कुठे पळून न जावो
मंदिरांमध्ये डांबलेली देवी
किती एकाकी,अंधार्या घरात
ना कुणाशी बोलणे ना हसणे ना रडणे
बस्स नेहमी आशिर्वादाच्या मुद्रेत
एका मुर्तीप्रमाणे
तू तर नाही विचार केलेला असला
आणि याप्रमाणे सोळा वर्षे
विचार करूनच आत्मा थरथरतो
पण देवी किंवा डायन बनवून
मारणार्यांचा आत्मा नाही थरथरत
त्यांचा आत्मा तर तेव्हा थरथरत असतो जेव्हा कुणी शर्मिला म्हणते
मी देवी नाही माणूस आहे
मी आत्मा नाही शरीर आहे
एका धडधडणार्या हृदयाची इच्छा आहे
खूप झाले याप्रमाणे,आता आणखी नाही
मी जगू इच्छितेय
मी करू पाहातेय
लग्न करू म्हणतेय
मुख्यमंत्री व्हावे म्हणतेय
लढावे म्हणतेय
याप्रमाणे एकटी देवी बनून नव्हे
जिवंत राहून,सर्वांना सोबत घेऊन लढावे म्हणतेय
आणि बघ
कसा भूकंप झाला आहे
आणि ते भक्तदेखील
तुझे आपलेदेखील
सर्वांनी तोंड फिरवलेय तुझ्यापासून
सोळा वर्षात त्यांना कधी नाही वाटले की तुझे डोके फिरले आहे
आज म्हणताहेत तुझे डोके बिघडले आहे
खाप पंचायतीसारखे फतवे काढताहेत
एका विदेशीबरोबर लग्न नाही करू शकत
तुला कुठले घर नाही मिळणार
जा पुन्हा त्याच तुरूंगात
यावे शर्मिला
यावे फक्त काही वेळच रडून घे
मन भरून रडून घे,गालिबला स्मरून
रडून घे
'दिल ही तो है न संग-ओ-खिश्त दर्द से भर न आये क्यों रोएंगे हम हजार बार कोई हमें सताये क्यों..
मौत से पहले आदमी गम से निजात पाएं क्यों'
मराठी अनुवाद
भरत यादव
मूळ हिंदी कविता
कोई हमें सताए क्यों !
ओ शर्मिला !
ये क्या ! तुम्हारी आँखों में आँसू
पर आँसू तो ज़िंदा लोगों के निकलते हैं !
मतलब तुम ज़िंदा हो ?
तुम्हें तो बहुत पहले ही मार दिया गया था !
जब तुम शर्मिला से प्रतिवाद और प्रतिरोध की देवी !
आयरन लेडी बना दी गयी थी !
जैसे मंदिरों में देवी-देवताओं को चढ़ाया जाता है प्रसाद !
तुम्हें भी चढ़ाया जाता था प्रसाद !
किया जाता था रख-रखाव !
रखा जाता था पहरा कि
कोई चुरा न ले देवी को या फिर
देवी कहीं भाग न जाए !
मंदिरों में बंद देवी !
कितनी एकाकी, अँधेरे घर में
न किसी से बोलना न हँसना न रोना
बस हमेशा आशीर्वाद की मुद्रा में
एक मूर्ती की तरह !
तुमने तो नहीं चाहा था ऐसा !
और इस तरह सोलह साल !
सोच कर ही रूह काँप जाती है ?
पर देवी या डायन बना कर
मारने वालों की रूह नहीं काँपती ?
उनकी रूह तो तब काँपती है जब कोई
शर्मिला कहती है मैं देवी नहीं इंसान हूँ !
मैं आत्मा नहीं शरीर हूँ !
एक धड़कते दिल की चाहत हूँ !
बहुत हो गया इस तरह, अब और नहीं !
मैं जीना चाहती हूँ,
प्रेम करना चाहती हूँ
शादी करना चाहती हूँ
सीएम बनना चाहती हूँ
लड़ना चाहती हूँ !
इस तरह अकेले देवी बनकर कर नहीं
ज़िंदा रहकर, सबको साथ लेकर लड़ना चाहती हूँ !
और देखो !
कैसा हड़कंप मच गया है !
और तो और वो भक्त भी, तुम्हारे अपने भी
सबने मुँह मोड़ लिया है तुमसे !
सोलह साल में उन्हें कभी नहीं लगा कि
तुम्हारा दिमाग़ ख़राब हो गया है
आज कहते हैं, तुम्हारा दिमाग़ ख़राब हो गया है
खाप पंचायतों की तरह फ़तवे दे रहे हैं !
एक विदेशी से शादी नहीं कर सकती !
तुम्हें कोई घर नहीं मिलेगा, जाओ फिर उसी कैद में !
आओ शर्मिला !
आओ बस कुछ देर के लिये रो लें !
जी भर कर रो लें ! ग़ालिब को याद करके रो लें
"दिल ही तो है न संग-ओ-ख़िश्त दर्द से भर न आये क्यों
रोएंगे हम हज़ार बार कोई हमें सताये क्यों
मौत से पहले आदमी ग़म से निजात पाये क्यों"।
©सरला माहेश्वरी
Sarala Maheswari