बाॅब डिलन यांची एक युद्धविरोधी कविता

बाॅब डिलन यांची एक युद्धविरोधी कविता

बाॅब डीलन यांची एक
युद्धविरोधी कविता

तुम्हीच बनवल्यात सगळ्या बंदूका

युद्धाच्या मालकांनो या!
तुम्हीच बनवल्यात सगळ्या बंदूका
तुम्हीच बनवलेत मृत्युची सगळी विमाने
तुम्ही बाॅम्ब बनवले
तुम्ही जे भिंतीमागे लपत आहात
लपत फिरताय तुम्ही तिपाईच्या मागे
मला वाटते की तुम्ही जाणून घ्यावेस
की मी तुमच्या मुखवट्यावरून पाहू शकतो जाहिरात

तुम्ही कधी काही नाही केले
परंतू जे काही बनवले ते विनाशासाठी
तुम्ही माझ्या जगाशी खेळताय
जणूकाही तुमचा लहानसा बाहुलाच आहे हे जग म्हणजे
माझ्या हातात बंदूक देऊन
माझ्या डोळ्यातून अस्पष्ट झालात तुम्ही
तुम्ही पाठ दाखवून सरपटत पळ काढलात
जशी बंदूकीची गोळी

कथेतील यहुदाप्रमाणे
तुम्ही खोटं बोलता आणि दगा देता
महायुद्ध जिंकलं जाऊ शकतं
असा तुम्ही भरवसा देताय मला
पण मी तुमच्या डोळ्याने पाहातोय
आणि मी तुमच्या डोक्याने बघतोय
जसे मी पाण्याच्या आत पाहातोय
पाणी जे माझ्या घरातील ड्रेनेजमधून
वाहाते आहे
तुम्ही ट्रिगर केला आहे वेगवान
लोक आणखी वेगाने करतील फायर
मग तुम्ही आरामात बसून मजा घेता
पुरेसे होतात मृत्यु जेव्हा
तुम्ही आपल्या प्रासादात लपता
नवयुवकांच्या शरीरातून वाहणारे रक्त
त्यांना त्या लाल चिखलात दफन करतं

तुम्ही सर्वात भयंकर भिती पसरवलीय
नाही मिळणार मुक्तता ज्यापासून कधी
की जगात मुलं न यावीत
माझे न जन्मलेले अनाम बाळ न येवो या जगात
तुम्ही त्या रक्तास योग्यही नाहीयेत
जे वाहाते आहे तुमच्या नसांनसांत
मी जाणतो आहे जितके
चढाओढीने चर्चा करा
म्हणू शकता तुम्ही की मी आहे तारूण्याच्या कैफात
नादान आहे मी
भले ही तुमच्यापेक्षा लहान आहे
परंतू एक गोष्ट मी जाणतो
तुम्हास येशूसुद्धा करणार नाही क्षमा
तुमच्या या कर्मासाठी

तुम्हाला एक सवाल आहे
काय तुमची धनदौलत
तुम्हाला क्षमा देववू शकेल?
असे करू शकेल?
असे वाटते मला 
जेव्हा तुमचा मृत्यु येईल
जितका पैसा तुम्ही कमावलाय
त्याने तुम्ही आपला आत्मा परत मिळवू शकणार नाही
मला वाटते की तुम्ही मराल
खूपच लवकर तुमचा मृत्यू येईल
मी तुमच्या ताबूताबरोबर चालेन
त्या मरण दुपारी
मी पाहीन जेव्हा तुम्ही
कबरीत उतरवले जाल
मी तुमच्या कबरीवर तोवर राहीन उभा
जोवर मला खात्री पटणार नाही तुम्ही मेले असल्याची.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
हिंदी अनुवाद
रमाशंकर सिंह

तुमने ही बनाईं सारी बंदूकें

आओ युद्ध के मालिकों
तुमने ही बनाईं सारी बंदूकें
तुमने ही बनाए मौत के सारे हवाई जहाज
तुमने बम बनाए
तुम जो दीवारों के पीछे छिपते हो
छिपते फिरते हो तुम तिपाई के पीछे
मैं चाहता हूँ कि तुम जान लो
कि मैं तुम्हारे मुखौटे से देख सकता हूँ
विज्ञापन

तुमने कभी कुछ नहीं किया
लेकिन जो भी बनाया वह विनाश के लिए
तुम मेरी दुनिया से करते हो खिलवाड़
जैसे यह तुम्हारा छोटा सा गुड्डा हो
मेरे हाथों में बंदूक थमा कर
मेरी आँख से ओझल हो गए तुम
तुमने पीठ दिखाकर सरपट दौड़ लगा दी
जैसे बंदूक की गोली

किस्सों वाले जुडास की तरह
तुम झूठ बोलते और देते हो धोखा
विश्वयुद्ध फतह किया जा सकता है
ऐसा तुम भरोसा दिलाते हो मुझे
लेकिन मैं तुम्हारी आँखों से देखता हूँ
और मैं तुम्हारे दिमाग से देखता हूँ
जैसे मैं पानी के भीतर देखता हूँ
पानी जो मेरे घर की नाली में बहता है
तुमने ट्रिगर कर दिए हैं तेज
लोग और तेजी से करें फायर
फिर तुम आराम से बैठकर मजा लेते हो
काफी हो जाती हैं मौतें जब
तुम अपनी हवेली में दुबक जाते हो
नौजवानों के शरीर से बहता लहू
उन्हें उस लाल कीचड़ में दफनाता है

तुमने सबसे भयानक डर फैलाए हैं
नहीं मिलेगी मुक्ति जिनसे कभी
कि दुनिया में बच्चे न आएँ
मेरा अजन्मा अनाम शिशु न आए इस दुनिया में
तुम उस खून के काबिल भी नहीं
जो बहता है तुम्हारी नसों में
मैं जानता हूँ जितना
बढ़-चढ़ बहस करना
कह सकते हो तुम कि मैं हूँ जवानी के जोश में
नादान हूँ मैं
भले ही तुमसे मैं छोटा हूँ
लेकिन एक चीज मैं जानता हूँ
तुम्हें ईसा भी नहीं करेंगे माफ
तुम्हारी कारगुजारियों के लिए

तुमसे एक सवाल है
क्या तुम्हारी दौलत
तुम्हें माफी दिला सकेगी?
ऐसा कर सकेगी?
ऐसा लगता है मुझे
जब तुम्हारी मौत आएगी
जितना पैसा तुमने बनाया है
उससे तुम अपनी आत्मा वापस नहीं पाओगे
मुझे लगता है कि तुम मरोगे
बहुत जल्द तुम्हारी मौत आएगी
मैं तुम्हारे ताबूत के साथ चलूँगा
उस मरियल दुपहरी में
मैं देखूँगा कि जब तुम
कब्र में उतारे जाओगे
मैं तुम्हारी कब्र पर तब तक रहूँगा खड़ा
कि मुझे यकीन हो जाए कि तुम मर गए हो

बाॅब डिलन 
Bob Dylan 
की
मूल अंग्रेजी कविता
'मास्टर्स आफ वार' का हिंदी अनुवाद.
https://youtu.be/h2mabTnMHe8
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने