असगर वजाहत यांची एक कथा

असगर वजाहत यांची एक कथा

असगर वजाहत यांची
एक कथा

शत्रू

ज्यांना ते आपले विरोधक मानत होते
त्या सर्वांचा निःपात केल्यानंतर ते लोक आपल्या गुरूजवळ गेले आणि 
म्हणाले-आपल्या आदेशानुसार आम्ही त्यांचे नामोनिशान मिटवून टाकले आहे.
संपूर्ण देशात आता कुणी असे शिल्लक नाही उरले जे आम्हाला आवडत नाहीत.
वर्षानुवर्षे प्रचंड हिंसा केलीय.
लाखोंचे रक्त सांडलेय.
गुरू म्हणाला,तुम्ही लोकांनी खूप मोठे कार्य केले आहे.
आता तुम्ही निवांत बसावे.
ते म्हणाले-आम्हाला निवांत बसायला जमत नाही.
मागील कैक पिढ्यांपासून आम्ही आराम नाही केला.
आम्हांला ठाऊकच नाहीये की आराम म्हणजे काय 
असतो ते.
जे काम आम्ही करत आलो आहोत तेच करत राहायचेय आम्हाला.
आम्हाला सांगा की आता कुणाचे नरडे आवळायचे आहे?
कुणाची हत्या करायची आहे? 
कुणाच्या रक्ताचा सडा शिंपडायचा आहे? 
आता हिंसा केल्याशिवाय आम्ही खाऊ शकत नाही,
झोपू शकत नाही,
प्रेम करू शकत नाही,
हिंडू फिरू शकत नाही,
सांगा गुरूवर्य....सांगा...सांगणे अत्यावश्यक आहे की आता आम्ही कुणाची डोकी उडवावीत?
गुरू म्हणाला,
नाही शिष्यानों नाही...आता हे काम करायचे नाहीये.आता कुणी असा उरलेच नाहीये,
सगळे आपले आहेत.
ते म्हणाले,
गुरुजी असे कसे होऊ शकते? शत्रूशिवाय आमचे आयुष्य व्यर्थ आहे आणि जो कुणी सांगत नाहीये की आमचा शत्रू कोण आहे ते, 
आता मग तोच आमचा शत्रू होय.
म्हणून तुच आमचा शत्रू आहेस.
ते पुढे सरसावले आणि 
त्यांनी गुरूचे मुंडके उडवून टाकले.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कथा

शत्रू

जिन्हें वे अपना विरोधी मानते थे उन सब का सफाया कर देने के बाद वे लोग अपने गुरु के पास पहुंचे और कहा- आपके आदेश के अनुसार हमने  उनका नामोनिशान मिटा दिया है। पूरे देश में अब कोई वैसा नहीं बचा है जिसे हम नहीं चाहते । वर्षों तक भयानक हिंसा की है। 
लाखों का खून बहाया है।
गुरु ने कहा,  तुम लोगों ने बहुत बड़ा काम किया है। 
अब तुम आराम से बैठो।
उन्होंने कहा- हमें आराम से बैठना नहीं आता। पिछली कई पीढ़ियों से हमने आराम नहीं किया। हम जानते ही नहीं कि आराम क्या होता है। जो काम हम करते चले आ रहे हैं वही करना चाहते हैं। हमें बताओ कि अब किस का गला काटना है? किसकी हत्या करनी है? किसका खून बहाना है? अब बिना हिंसा किए हम खा नहीं सकते, सो नहीं सकते, प्रेम नहीं कर सकते, चल फिर नहीं सकते। बताओ गुरु.... बताना अति आवश्यक है कि अब हम किनके सिर काटें ?
गुरु ने कहा-  नहीं शिष्य नहीं....अब यह काम नहीं करना है। अब कोई वैसा बचा ही नहीं। सब अपने हैं।
उन्होंने कहा -  गुरु जी यह कैसे हो सकता है? शत्रु के बिना हमारा जीवन बेकार है। और जो नहीं बता रहा कि हमारा शत्रु कौन है वही हमारा शत्रु है। इसलिए तुम हमारे शत्रु हो।
वे आगे बढ़े और उन्होंने गुरु की गर्दन उड़ा दी।

©असगर वजाहत
Asghar Wajahat
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने