झोप आणि जागणे
अंधाराबरोबर झोपी जाणे अशा पद्धतीने
जोडले गेले की रात्र होताच आया लेकरांना थोपटत असत
खरेतर अंधारलेल्या काळात सर्वात गरजेचे होते जागे राहाणे
झोपून अंधार तर व्यतीत करू शकतो पण
नष्ट नाही करू शकत
सर्वात दाट अंधारांनी सर्वात गोड झोप घेऊन येणे
हे उजेडाच्या विरूद्ध त्यांचे कारस्थान होते
आम्ही झोपेला ढाल बनवले
अंधाराला सवय
जागणे तुलनेने आव्हान होते
जागण्याचे आपले धोके होते
अंधारात जागे राहाणारे
अल्पसंख्याकांमध्ये गणले गेले
झोपी गेलेल्या समाजाने यांच्याकडे नेहमी संशयाने पाहिले
अंधाराने झोपेचा नियम लागू केला होता
प्रकाशाच्या शोधार्थ जागलेले लोक अपराधी सिद्ध झाले
अंधार्या काळातल्या दिवसातही इतका अंधार होता की
जागणार्यांना देशविरोधी घोषीत केले गेले
झोपी गेलेल्या लोकांनी मिळून त्यांच्याविरूद्ध मतदान केले
कालांतराने झोपी गेलेल्या लोकांचे सरकार बनले
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
अंधेरे के साथ सोना इस तरह जुड़ा रहा
कि रात होते ही माएँ बच्चों को थपकियाँ देने लगती
जबकि अंधेरे समय में सबसे ज़रूरी था जागना
सोकर अंधेरा काट तो सकते हैं
मिटा नहीं सकते
सबसे घने अंधेरे सबसे मीठी नींद लेकर आए
ये रोशनी के ख़िलाफ़ उनकी साजिश थी
हमने नींद को ढाल बना लिया
अंधेरे को आदत
जागना बनिस्बत चुनौती था
जागने के अपने ख़तरे थे
अंधेरे में जागने वाले अल्पसंख्यकों में गिने गए
सोये हुए समाज ने इन्हें हमेशा संदेह से देखा
अंधेरे ने नींद का नियम लागू किया था
रोशनी की खोज में जागे लोग अपराधी साबित हुए
अंधेरे समय के दिनों में भी इतना अंधकार था
कि जागने वालों को देश विरोधी घोषित किया गया
सोये हुए लोगों ने मिलकर उनके ख़िलाफ़ वोट किया
कालांतर में सोये हुए लोगों की सरकार बनी
©श्रुती कुशवाहा
कलाःअनुप्रिया Art: Anu priya