आणि इकडे आम्ही मजेत आहोत !

आणि इकडे आम्ही मजेत आहोत !

आणि इकडे आम्ही मजेत आहोत !

आपल्या धर्मशास्त्रांत देवदानवांच्या संघर्षाच्या कथा आहेत
देवदानव संघर्षात दानवांचे वर्णन वाचा
लिहिलं आहे की दानव काळ्या रंगाचे असायचे मोठे नाक असे कुरळे केस असायचे आणि त्यांना शिंगं असायची
हे नेमकं मध्यभारतातील आदिवासींचं वर्णन आहे
आजही बस्तरमधील आदिवासी शिंग लावून नाचतात
आमच्या पूर्वजांनी आदिवासींच्या भूमीवर कब्जा केला त्यांना मारून टाकलं
आम्ही स्वतःला देव घोषित केले आणि त्यांना राक्षस

आज पून्हा आम्ही त्यांना मारण्यास निघालो आहोत
आमच्या मिडियाने आधीसुद्धा खोटं सांगितलं होतं आणि फेक न्यूज दिली होती
आपला जुना मिडिया आहे धर्मशास्त्र
ब्राह्मणांनी त्यातून फेक न्यूज दिल्या
आणि अविरत त्यास पसरवत ठेवले
भांडवलदार नवा ब्राह्मण होय
तो आपणांस फेक न्यूज देतो आहे
की बस्तर मध्ये आपण दहशतवाद्यांना मारतो आहोत
आणि आपले सैनिक खूप मोठे देशभक्तीचे काम करताहेत
परंतू मागच्यावेळेप्रमाणे यावेळेसही ही फेक न्यूज आहे
पूर्वीही आम्ही आदिवासींच्या जमिनींवर कब्जा केला त्यांना जंगलात ढकलून लावले आणि त्यांना वाईट ठरवून टाकले
आम्ही पून्हा तसे करत आहोत
मागच्यावेळेसदेखील आदिवासींची हत्या करणार्‍यांना आम्ही सन्मान 
दिला देवता म्हणालो देव म्हणालो आणि देवी म्हणालो
आम्ही सातत्याने आदिवासींबरोबर
युद्ध लढत आहोत
अधिकाधिक उपभोगावर आधारीत आमचे अर्थशास्त्र आणि जीवनशैली
आम्हाला इतरांच्या साधनसंपत्तीवर शस्त्रांच्या बळावर ताबा मिळवण्यासाठी उद्युक्त करते
कधी आपण यास धर्मरक्षणाचे नाव देतो तर कधी राष्ट्ररक्षणाचे
पण खरेतर आमचे सैन्य आमच्यासाठी साधनसंपत्तीची लूट करणार्‍या आम्हां लुटारूंकरिता काम करणारे भाडोत्री मारेकरी आहेत
आमची शहरं फक्त फस्त करतात उत्पादीत काहीच करीत नाहीत
त्यामुळे आमचे सैन्य एका जंगलातून गावांमधून आमच्यासाठी लूट करते तेव्हा कुठे आम्ही खात आहोत
यासाठी आम्ही घोषणा देतो की
सैनिकांच्या सन्मानार्थ सॅल्यूट
खरेतर आम्ही लुटारू आणि मारेकरी आहोत
आज अवघ्या आदिवासी भागात सैनिक भरले आहेत ते सातत्याने हत्या करताहेत बलात्कार करताहेत निर्दोष आदिवासी जनतेला तुरूंगांमध्ये कोंबण्यात आलं आहे.

आणि इकडे आम्ही मजेत आहोत.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी टिपण

हमारे धर्म शास्त्रों में देव दानव संघर्ष की कहानियां है
देव दानव संघर्ष में दानवों का वर्णन पढ़िए
लिखा है दानव काले रंग के होते थे मोटी नाक होती थी घुंघराले बाल होते थे और उनके सींग होते थे
यह ठीक मध्य भारत के आदिवासियों का वर्णन है
आज भी बस्तर के आदिवासी सींग लगा कर नाचते हैं
हमारे पूर्वजों ने आदिवासियों की जमीनों पर कब्जा किया उनको मारा 
हमने खुद को देवता घोषित कर दिया और उनको राक्षस

आज फिर हम उन को मारने निकल पड़े हैं
हमारे मीडिया ने पहले भी झूठ बोला था और फेक न्यूज़ दी थी
हमारा पुराना मीडिया है धर्मशास्त्र
ब्राह्मणों ने उसमें फेक न्यूज़ दी और लगातार उसको फैलाते रहते हैं
पूंजीपति नया ब्राह्मण है
वह आपको फेक न्यूज़ दे रहा है कि बस्तर में हम आतंकवादियों को मार रहे हैं
और हमारे सैनिक बहुत बड़ी देश भक्ति का काम कर रहे हैं
लेकिन पिछली बार की तरह इस बार भी यह फेक न्यूज़ है
पहले भी हमने आदिवासियों की जमीनों पर कब्जा किया उन्हें जंगलों में धकेल दिया और उन्हें खराब घोषित कर दिया
हम फिर ऐसा कर रहे हैं
पिछली बार भी आदिवासियों की हत्या करने वालों को हमने सम्मान दिया देवता कहा भगवान और देवी कहा 
हम लगातार आदिवासियों से युद्ध में है
ज्यादा से ज्यादा उपभोग पर आधारित हमारा अर्थशास्त्र और जीवन शैली 
हमें दूसरों के संसाधनों पर हथियारों के बल पर कब्जा करने के लिए प्रेरित करता है
कभी हम इसे धर्म रक्षा का नाम देते हैं और कभी राष्ट्र रक्षा का
लेकिन असल में हमारी सेना हमारे लिए संसाधनों की लूट करने वाले हम लुटेरों के लिये काम करने वाले भाड़े के हत्यारे  है
हमारे शहर सिर्फ खाते हैं उत्पादन कुछ नहीं करते
इसलिए हमारी सेना एक जंगलों से गांव से हमारे लिए लूट कर लाती है तो हम खाते हैं
इसलिए हम नारा लगाते हैं सैनिकों के सम्मान में सैल्यूट
असल में हम लुटेरे और हत्यारे हैं
आज सारे आदिवासी इलाकों में सैनिक भरे हुए हैं वे लगातार हत्या कर रहे हैं बलात्कार कर रहे हैं निर्दोष आदिवासियों को जेलों में ठूंस दिया गया है

और इधर हम मस्त हैं

©हिमांशु कुमार
Himanshu Kumar 


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने