मुंग्या आणि इतर कविता

मुंग्या आणि इतर कविता

मुंग्या आणि
इतर कविता

१.
मुंग्या

एकट्या मुंगीला 
चिरडून टाकणे खूप सोपे असते
पण जेव्हा एकाचवेळी चालायला लागतात,
लक्षावधी मुंग्या,
तेव्हा
जंगलचा राजादेखील
वाट मोकळी करून देत असतो

२.
बाग

जेव्हा वारा सुटतो 
बाग हेलकावू लागते
वारा वाहात असतो तेव्हा वादळात 
परावर्तीत होण्याची शक्यतासुद्धा 
त्यासोबत चालत असते

सम्राटाला वारा आवडत नाही
वादळे तर अजिबातच नाही
त्याची बागांविषयी विशेष तक्रार आहे
त्याने आपल्या डायरीत नोंद केलीय,
'बाग म्हणजे बंडखोरी होय.'

३.
डोळ्यांची भाषा

जेव्हाही कुणाची
जिव्हा बंद केली जाते
डोळे बोलायला सुरूवात करतात

जिव्हा किंवा बोली निरनिराळ्या
असू शकतात संपूर्ण जगात
पण एक असते डोळ्यांची भाषा

४.
बुलडोझर

जेव्हा सरकारकडे
प्रश्नांची उत्तरे असत नाहीत
बुलडोझर बाहेर पडतात
जेव्हा झोपड्या शहरात दाखल 
होत असतात,
बुलडोझर बाहेर पडतात
जेव्हा लोक घाबरणे बंद करतात
बुलडोझर बाहेर पडतात

हे विचारणे गुन्हा आहे
की बुलडोझर का बाहेर पडले
बुलडोझर बाहेर पडतात
तेव्हा कायद्याच्या ग्रंथातसुद्धा
दात खुपसतात

५.
पुतळे

मी पुतळे तोडतो,बनवतो
वर्षांनुवर्षे हेच काम करून करून
मी पुतळ्यांप्रमाणेच टणक,
बहिरा आणि मुका झालो आहे
मी एक पुतळा बनवला
लोक म्हणाले,हे गांधीजी आहेत
मी आणखी एक पुतळा बनवला
सर्वजण म्हणाले,हे बुद्ध आहेत
याचप्रकारे मी खूप सारे 
पुतळे तयार केलेत
आता माझ्याकडे 
भगतसिंग आहेत,
सुभाषबाबू आहेत,
बाबासाहेब आंबेडकर आहेत,
सरदार पटेल आहेत
माझ्या हातात कलेची वेसण आहे
कुणालाही पुतळा वा मुर्तीत परावर्तीत
करणे माझ्या उजव्या हाताचा मळ आहे

६.
जागणे

एक

जागे राहा कारण जागे राहाणे हीच
बचावण्याची पहिली अट आहे
फक्त जागे असलेले लोकच पाहू शकतात,
लांबललांब रस्त्यांवर कोसळलेले पूल,
आकाशात घोंगावणारे काळे ढग,
तेच समजू शकतात आगलाव्यांचे कारस्थान

जागे राहा
हे जाणूनदेखील की, 
जागे राहिल्याने दुःख आणि 
रडणेच येते वाट्याला
जे जागे राहात असतात,
फक्त त्यांच्यावरच असते 
हुकूमशहाची करडी नजर,
तेच सर्वात जास्त धोक्यात असतात,
त्यांनाच झोपवण्याचे 
सर्वात जास्त प्रयत्न होत असतात

दोन

जे आज झोपेत आहेत
तेच उद्या पुरस्कृत ठरतील
हुकूमशहा खुश आहे की 
आजारपण आणि लाचारीतसुद्धा 
गाढ झोपू शकते जनता
फार कमी लोकांना ठाऊक आहे की
झोपेत केवळ मृत्यूचे कवाड उघडते
झोप मोडल्यावरच कळते की 
झोप किती दीर्घ होती ते,
झोपेत किती स्वप्नं मारली गेलीत.
जोपर्यंत आपण जागे असतो 
झोप निघून गेलेली असते
आपल्या आयुष्याचा एक भाग चोरून
हुकूमशहाची निर्धास्तता थोडी आणखी वाढवून.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

1.

चींटी 

अकेली चींटी को
कुचल देना बहुत आसान है
पर जब एक साथ निकल पड़ती हैं
करोड़ों करोड़ चींटियाँ
जंगल का राजा भी
खाली कर देता है रास्ता

2.

बाग़ 

जब हवा चलती है बाग झूमने लगता है
हवाएं चलती हैं तो आंधी में बदल जाने की 
संभावना भी उनके साथ चलती है

शहंशाह को हवाएं पसंद नहीं
आंधियां तो बिलकुल ही नहीं
उसे बागों से भारी शिकायत है
उसने अपनी डायरी में दर्ज किया
बाग के माने बगावत है

3. 

आंखों की भाषा

जब भी किसी की
जुबान बंद कर दी जाती है
आंखें बोलना शुरू कर देती हैं

जुबानें अलग-अलग
हो सकती हैं सारी दुनिया में
पर एक होती है आंखों की भाषा

4.

बुलडोजर

जब सरकार के पास  
सवालों के जवाब नहीं होते
बुलडोजर निकल आते हैं
जब झुग्गियां शहरों में दाखिल हो जाती हैं
बुलडोजर निकल आते हैं
जब लोग डरना बंद कर देते हैं
बुलडोजर निकल आते हैं   

यह पूछना अपराध है
कि बुलडोजर क्यों निकले
बुलडोजर निकलते हैं
तो कानून की किताबों पर भी दांत गड़ा देते हैं 

5. 

मूर्तियाँ

मैं मूर्तियाँ तोड़ता, बनाता हूँ
वर्षों से यही काम करते-करते 
मैं मूर्तियों की तरह ही कठोर
बहरा और गूंगा हो गया हूँ
मैंने एक मूर्ति बनायी 
लोगों ने कहा, यह गांधी हैं
मैंने एक और मूर्ति बनायी
सबने कहा, यह बुद्ध हैं
इसी तरह मैंने ढेर सारी मूर्तियाँ बनायीं
अब मेरे बाड़े में भगत सिंह हैं
सुभाष हैं, आंबेडकर हैं, पटेल है
मेरे हाथ में कला की नकेल है
किसी को भी मूर्ति में बदल देना मेरे
लिए बांयें हाथ का खेल है

6.

जागना

1.
जागते रहो
कि जागते रहना ही बचे रहने की पहली शर्त है
सिर्फ जगे हुए लोग ही देख सकते हैं 
लम्बे रास्तों में दरके पुल
आसमान में घिरते काले बादल
वही समझ सकते हैं आततायी का छल

जागते रहो
यह जानकर भी कि जागते रहने पर 
दुख और रोना ही आता है हिस्से में  
जो जागते रहते हैं, सिर्फ उन्हीं पर 
रहती है तानाशाह की नजर
वही सबसे ज्यादा खतरे में होते हैं
उन्हीं को सुला देने की‌ सबसे ज्यादा 
कोशिशें होती हैं

2.
जो आज नींद में हैं
वही कल पुरस्कृत होंगे 
तानाशाह खुश है कि बीमारी और लाचारी 
में भी गहरी नींद सो सकती है प्रजा
कम लोग जानते हैं कि नींद में 
सिर्फ मृत्यु का दरवाजा खुलता है
नींद टूटने पर ही पता चलता है 
कि नींद कितनी लम्बी थी 
नींद में कितने सपने मारे गये
जब तक हम जागते हैं नींद जा चुकी होती है
हमारी उम्र का एक हिस्सा चुराकर
तानाशाह की निश्चिंतता थोड़ी और 
बढ़ाकर

©सुभाष राय
Subhash Rai 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने