मोहाचा दोष नव्हे

मोहाचा दोष नव्हे

मोहाचा दोष नव्हे

मोहपेय पिऊन तू पूर्वी
प्रेमगीतं गायचास
कुठलीशी कथा ऐकवत असायचास
नाचत असायचा,
थकूनभागून झोपी जायचास
पण मोहपेय ढोसून आता तू
हिंसा करतोयस,
मारेकरी बनतोयस
आणि 
सगळा दोष मोहावरती ढकलून देतोयस

मोहाचा दोष नाहीये,
मोह तर अजूनही तिथेच आहे
पण काय बदल घडलाय रे तुझ्याआत?
जो प्रत्येक वेळेस मोह पिताच बाहेर पडत असतो.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav

मूळ हिंदी कविता

महुआ का दोष नहीं

महुआ पीकर तुम पहले 
प्रेम के गीत गाते थे
कोई कथा सुनाते थे
नाचते थे, थककर सो जाते थे
पर महुआ पीकर अब तुम
हिंसा करते हो, हत्यारे हो जाते हो
और सारा दोष महुआ पर डाल देते हो

महुआ का दोष नहीं
महुआ तो अब भी वही है
पर क्या बदल गया है तुम्हारे भीतर
जो हर बार महुआ पीते ही बाहर आ जाता है ।।

©जसिंता केरकेट्टा
jashinta kerketta
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने