आजकालचे अभंग!

आजकालचे अभंग!

आजकालचे अभंग!
🚩
विद्वेषाची आग
जाळते नव्याने
मांडती सोयीने
इतिहास

घृणा सजविती
ठेवती पुढ्यात
काढती वेड्यात
प्रेक्षकांना

भांडवल ज्यांचे
आहे तिरस्कार
तेच सरकार
चालविती

तेच भरविती
घृणेचा बाजार
बंधुभाव ठार
मारूनिया

तरुण मेंदूत
विषाची पेरणी
करती फाळणी
पुनःपून्हा

भिन्न धर्म आणि
भिन्न विचारांना
शत्रू सकलांना
ठरविती

प्रचारकी तांडे
रंगविती खेळ
कलेची निव्वळ
धूळफेक

काल त्यांनी केले
आज आम्ही करू
आणि जीव मारू
भारताचा

जुन्या फाईलींची
करता छाननी
नव्याने डागणी
काळजास

रक्त मांस इथे
भलतेच स्वस्त
विचार फकस्त
सत्तेचाच

नाही नाही ऐशा
उन्मादास अंत
लोक हो त्वरित
व्हावे जागे
🚩
-भरत यादव
Bharat Yadav
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने