तुका कुणबी गं
माझा बंधु धाकटा
त्याच्या अभंगवाणीनं
दूर होई शीणवटा
पिढीजात महाजनी
दिली क्षणात सोडून
कर्जमुक्त केले जन
गेला भक्तीत रंगून
माझ्या तुकोबाला
किती किती छळलेले
नाव विठूचे घेऊन
त्याने दुःख पचविले
नाही कुणा गुरू केले
नाही शिष्य गोतावळा
त्याच्या जिवीचा जिवलग
पंढरीचा तो सावळा
नाही वैकुंठी सदेह
तुकाराम कधी गेला
माझ्या डोहात बुडवूनी
त्याला दुष्टांनी मारिला !
-भरत यादव
Bharat Yadav
ओंकार अविनाश पाटील
चित्र क्रमांक २ःअज्ञात
इंद्रायणीचे मनोगत खूप खूप सुंदर !
उत्तर द्याहटवाधन्यवाद लिहिल्याबद्दल.