झाडांनी तुम्हाला
झाडं लावण्यास नाही सांगितलं
फक्त आपल्या वाट्याची जमीन सोडण्यास सांगितलं
जिथं आपल्या पद्धतीने उगवू शकतील ते
पण तुम्ही त्यांच्या वाट्याच्या जमिनीवर अडून राहिलात
आणि
'झाडं लावा,पृथ्वी वाचवा'ची
घोषणा देत राहिलात
जिवंत राहाण्याकरिता
श्वास घेऊन पण अजून
तुम्ही मोठ्या अडचणीतून
श्वास सोडण्याचा सराव करत आहात
झाडांच्या वाट्याची धरती सोडून देणं
तुमच्या आवाक्यातील गोष्ट आहे काय?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
पेड़ों ने तुमसे क्या कहा
पेड़ों ने तुमसे
पेड़ लगाने को नहीं कहा
बस अपने हिस्से की ज़मीन छोड़ने को कहा
जहां अपने तरीके से वे उग सकें
पर तुम उनके हिस्से की ज़मीन पर जमे रहे
और "पेड़ लगाओ, धरती बचाओ" का नारा लगाते रहे
जिंदा रहने के लिए
सांस लेकर भी अभी
तुम बड़ी मुश्किल से
सांस छोड़ने का अभ्यास कर रहे हो
पेड़ों के हिस्से की धरती छोड़ देना
क्या तुम्हारे बस की बात है ?
©जसिंता केरकेट्टा
Jacinta Kerketta