उभे राहाण्यात त्यांची कुठली असहायता नव्हती
बस्स त्यांना सांगण्यात आलं दरवेळेस
'चला, तुम्ही पोरं आहात उभे राहा या
तुम्हां निःसंगांचं काही बिघडणार नाही'
लहानसहान कारणांवरून ते उभे राहिले वर्गाबाहेर
शाळेच्या निरोपसमारंभावेळी जेव्हा घेण्यात आले
ग्रूप फोटो
पोरी कायम पुढे बसल्या
आणि पोरं परस्परांच्या बगलेत हात घालून
मागे उभे राहिले
ते फोटोंमध्ये आजपावेतो उभे आहेत
काॅलेजाबाहेर उभे राहून
करत राहिले कुण्या पोरीची प्रतिक्षा
वा कुठल्याशा घराबाहेर तासनतास उभे राहिले
एखादी झलक,
एखाद्या होकारासाठी
आपल्या स्वतःला अर्धवट सोडून
ते आजही तिथेच राहिले आहेत
बहिणीबाळींच्या लग्नात उभे राहिले मंडपाबाहेर
वरातीचे स्वागत करण्यासाठी
उभे राहिले रात्रभर स्वयंपाक्याजवळ
कुठे भाजीत त्रुटी न राहावी म्हणून
उभे राहिले जेवणाच्या स्टाॅलसोबत
कुठे चव ना संपून जाईल म्हणून
उभे राहिले नवरीच्या पाठवणीपर्यंत
दरवाजाच्या मदतीने
आणि मंडपाचा शेवटचा खांब उखडेपर्यंत
लेकीबाळी जोवर माघारी परततील
ते उभे राहिलेलेच आढळतील
ते उभे राहिले बायकोला सीटवर बसवून
बस किंवा रेल्वेची खिडकी पकडत
ते उभे राहिले बहिणीबरोबर घरकामात एखादी अवजड वस्तू पेलत
ते उभे राहिले आईच्या
ऑपरेशनच्यावेळेस
ओ.टी.बाहेर तासनतास
ते उभे राहिले वडिलांच्या मृत्यूवेळी शेवटचे लाकूड जळेपर्यंत
ते उभे राहिले डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत
अस्थीविसर्जनावेळी गंगेच्या बर्फगार पाण्यात
पोरांनो,
तर तुमच्या पाठीला पण कणा आहे,
काय रे तो कधी आखडत-अवघडत नसेल?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
लड़के हमेशा खड़े रहे
खड़ा रहना उनकी कोई मजबूरी नहीं रही
बस उन्हें कहा गया हर बार
चलो तुम तो लड़के हो खड़े हो आओ
तुम मलंगों का कुछ नहीं बिगड़ने वाला
छोटी-छोटी बातों पर वे खड़े रहे कक्षा के बाहर
स्कूल विदाई पर जब ली गई ग्रुप फोटो
लड़कियाँ हमेशा आगे बैठी
और लड़के बगल में हाथ दिए पीछे खड़े रहे
वे तस्वीरों में आज तक खड़े हैं
कॉलेज के बाहर खड़े होकर
करते रहे किसी लड़की का इंतजार
या किसी घर के बाहर घंटों खड़े रहे
एक झलक,एक हाँ के लिए
अपने आपको आधा छोड़
वे आज भी वहीं रह गए हैं।
बहन-बेटी की शादी में खड़े रहे मंडप के बाहर
बारात का स्वागत करने के लिए
खड़े रहे रात भर हलवाई के पास
कभी भाजी में कोई कमी ना रहे
खड़े रहे खाने की स्टाल के साथ
कोई स्वाद कहीं खत्म न हो जाए
खड़े रहे विदाई तक दरवाजे के सहारे
और टैंट के अंतिम पाईप के उखड़ जाने तक
बेटियाँ-बहनें जब तक वापिस लौटेंगी
वे खड़े ही मिलेंगे।
वे खड़े रहे पत्नी को सीट पर बैठाकर
बस या ट्रेन की खिड़की थाम कर
वे खड़े रहे बहन के साथ घर के काम में
कोई भारी सामान थामकर
वे खड़े रहे माँ के ऑपरेशन के समय
ओ. टी. के बाहर घंटों
वे खड़े रहे पिता की मौत पर अंतिम लकड़ी के जल जाने तक
वे खड़े रहे दिसंबर में भी
अस्थियाँ बहाते हुए गंगा के बर्फ से पानी में
लड़कों रीढ़ तो तुम्हारी पीठ में भी है
क्या यह अकड़ती नहीं?
©सुनीता करोथवाल
sunita karothwal