राम स्वतः पुरावा आहेत.

राम स्वतः पुरावा आहेत.

राम स्वतः पुरावा आहेत

आपले अपहरण करणार्‍या
रावणाच्या कुळातील त्रिजटेला
सीता,माता संबोधत होती

आपला कट्टर शत्रू रावणाच्या बंधूला
रामाने मित्र म्हणत
अलिंगन दिले होते

याच्याहून अधिक आणखी काय पुरावा हवा आहे की
व्यक्ती चूकीची असू शकते
त्याचा संपूर्ण समाज नव्हे

राम स्वतः पुरावा आहेत
या गोष्टीचे
की धर्माचे रक्षण, एकाधिकारशाही
स्थापित करून नव्हे तर
आदर्श निर्माण करण्याने होऊ शकेल

किती हास्यास्पद आहे
की पशू-प्राणी आणि माणसांचाही
एकोपा घडविणार्‍या रामाचा उपयोग
( सद्या मात्र ) 
माणसांना माणसांपासून वेगळे करण्यासाठी होतो आहे.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

राम स्वयं प्रमाण हैं

अपना हरण करने वाले 
रावण के कुल की त्रिजटा को
सीता, माता कहकर पुकारती थीं

अपने परम शत्रु रावण के भाई को
राम ने मित्र कहकर
गले से लगा लिया

इससे अधिक और क्या प्रमाण चाहिए
कि व्यक्ति ग़लत हो सकता है
उसका पूरा समुदाय नहीं

राम स्वयं प्रमाण हैं
इस बात का
कि धर्म की रक्षा, एकाधिकार स्थापित करने से नहीं
आदर्श स्थापित करने से होगी

कितना हास्यास्पद है
कि पशुओं और इंसानों तक में एका कराने वाले 
राम, का उपयोग
इंसानों को इंसानों से अलग करने के लिए हो रहा है ।

©शेफाली शर्मा
Shefali Sharma 
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने