एक
सकाळच्या पारी
गाय उभी राहायची दारावर
आई एक भाकर तोंडात देववून
डोक्यावरून हात फिरवायची मायेने
कृतज्ञ गाय पापण्या मिटून घ्यायची
आणि डोळ्यात थांबलेले पाणी
थेंब थेंब टपकत राहायचे
आईच्या डोळ्याच्या कडांवर
येऊन थबकायचे तेच पाणी
पुढच्याच क्षणी
आई सांगायची
गाईच्या डोळ्यात नेहमी माया असते
कृतज्ञता असते,वात्सल्य असते
ती संतापते तेव्हादेखील,
तिच्या डोळ्यात उतरत नसतो संताप
मी पुढच्याच क्षणी आईच्या डोळ्यात डोकावायचो,
ती गाईसारखी दिसायची
निर्मळ निर्वैर सजल
दोन
आई म्हणायची
पोरांमध्ये असत नाहीत गाईसारखे डोळे
पोरींमध्येही सगळ्याजणीत नसतात
मी गाईसारख्या डोळ्यांची पोर पाहतो
आणि आईला आठवायला लागतो
मी गाईसारख्या डोळ्यांच्या मुलींच्या
डोळ्यात थबकलेले पाणी पाहतो
तेव्हा भ्यायला लागतो
मग विचार करतो
कृतज्ञता जिथे कुठे शिल्लक असेल
सांभाळली गेली पाहिजे
तीन
आई म्हणायची
सगळ्या पोरींचे डोळे
गाईसारखे नसतात
सगळ्या बाया मात्र
गाय होऊन जातात एक दिवस.
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
गाय जैसी आँखों वाली लड़की
सुबह सवेरे
गाय आ खड़ी होती थी चौखट पर
मां एक रोटी मुंह में पकड़ा
सर पर हाथ फिरा देती थी प्रेम से
कृतज्ञ गाय पलक को बंद करती
और आँख में ठहरा पानी
बूँद बूँद टपक पड़ता
मां की आँख के कोर में
आ ठिठकता वही पानी
अगले ही क्षण
माँ बताती
गाय की आँख में हमेशा स्नेह होता है
कृतज्ञता होती है, वात्सल्य होता है
वह गुस्सा भी होती है
तब भी, उसकी आँख में नहीं उतरता गुस्सा
मैं अगले ही क्षण माँ की आँख में झांकता
वह गाय जैसी दीखती
निर्मल निरवैर, सजल
2
मां कहती थी
लड़को में नहीं होतीं गाय जैसी आँखें
लड़कियों में भी सबमे नहीं होती
मैं गाय जैसी आँखों वाली लड़की देखता हूँ
और मां को याद करने लगता हूँ
मैं गाय जैसी आंख वाली लड़कियों की आँख में
ठहरा हुआ पानी देखता हूँ
तो डरने लगता हूँ
फिर सोचता हूँ
कृतज्ञता जहाँ कही भी बची हो
सहेज ली जानी चाहिए
3
मां कहती थी
सब लड़कियों की आँख
गाय जैसी नहीं होती
सभी स्त्रियां लेकिन
गाय हो जाती हैं एक दिन
©वीरेंदर भाटिया
virendar bhatia