तो मुस्लिमांना खूप घाबरायचा!

तो मुस्लिमांना खूप घाबरायचा!

तो मुस्लिमांना खूप घाबरायचा!

माझा एक दोस्त नेहमी म्हणायचा,
की या धार्मिक ऐक्याच्या गोष्टी
निव्वळ बोलायला चांगल्या वाटतात.
म्हणायचा की, 
तू मुस्लिमांच्या मोहल्यात एकटा कधी गेलायस का?
जाऊन बघ,
भीती वाटते..!

तो मुस्लिमांना खूप भ्यायचा
खरेतर त्याला शाहरुख खान खूप आवडायचा
त्याच्या गालावर खिळणारी खळी
आणि त्याचे दिवाळीला रिलीज होणारे चित्रपटही
दिलीप कुमार युसुफ आहेत,हे
त्याला माहित नव्हते
त्यांचे चित्रपटही तो प्रचंड आवडीने पाहायचा,
तो त्यांना नाही भ्यायचा
फक्त मुस्लिमांना घाबरायचा

तो वाट बघायचा,
आमिरच्या नाताळ रिलीजची
आणि सलमानच्या ईदीची
जर ब्लॅकमध्येही तिकीटं मिळाली
तरी तो शिट्या मारत बघून यायचा
तो त्यांना नाही भ्यायचा
फक्त मुस्लिमांना घाबरायचा

तो माझ्याबरोबर इंजिनियर झाला
विज्ञानात त्याचा इतका रस की
म्हणायचा की,
डाॅ.अब्दुल कलामांप्रमाणे 
मलाही शास्त्रज्ञ 
बनायचेय
आणि देशाचा गौरव वाढवायचाय
तो त्यांना नाही भ्यायचा
फक्त मुस्लिमांना घाबरायचा

तो क्रिकेटचाही वेडा होता
खास करुन 
मन्सूर अली खान यांच्या नवाबी षटकारांचा
मोहम्मद अझरुद्दीनच्या मनगटी फटक्यांचा
झहीर खान आणि इरफान पठाण यांच्या 
उसळत्या चेंडूंचा...
म्हणायचा की, 
हे सगळे जादूगार आहेत
हे खेळले तर आपण कधीच नाही हरणार पाकिस्तानबरोबर
तो त्यांना नाही भ्यायचा,
फक्त मुस्लिमांना घाबरायचा

तो नर्गिस आणि मधुबाला यांच्या सौंदर्याचा चाहता होता
त्यांना तो कृष्णधवल मध्ये पाहू इच्छित असे
तो चाहता होता वहिदा रेहमानच्या स्मितहास्याचा
आणि परवीन बाॅबीवरील प्रेमाचा
तो त्यांना नाही भ्यायचा
फक्त मुस्लिमांना घाबरायचा

तो जेव्हा केव्हा दुःखी असायचा तेव्हा 
मोहम्मद रफींची गाणी ऐकायचा
म्हणायचा की,
देव वसतोय रफी साहेबांच्या कंठात
तो रफींचं नाव कानाला हात लावूनच घ्यायचा आणि नावापुढे नेहमी साहेब लावायचा
जेव्हा तो साहिरनीं लिहिलेली गाणी गुणगुणायचा  तेव्हा तर आनंदानं भडभडून रडावं असं त्याला वाटायचं
तो त्यांना नाही भ्यायचा
फक्त मुस्लिमांना घाबरायचा

तो प्रत्येक सव्वीस जानेवारीला अल्लामा इक्बालांचे
 'सारे जहां से अच्छा' गायचा
म्हणायचा की,जर गाण्यात बिस्मिल्ला खानांची शहनाई आणि झाकिर हुसेनांचा तबला असेल तर 
'व्वा क्या कहने!'
तो त्यांना नाही भ्यायचा
फक्त मुस्लिमांना घाबरायचा

तो जेव्हा प्रेमात पडला एका मुलीच्या
तेव्हा गालिबच्या गजला म्हणायचा
फैजचे काही शेर पाठवायचा
त्याच उसन्या उर्दू काव्यपंक्तींवर फिदा झालेली त्याची प्रिया
जी आज त्याची पत्नी आहे
तो या सर्व शायरांना नाही भ्यायचा
फक्त मुस्लिमांना घाबरायचा

मोठा खोटारडा होता माझा दोस्त
आणि भोळसटही
तो नकळतपणे प्रत्येक मुस्लिमावर
करत होता इतके प्रेम

तरिही का कोण जाणे का म्हणायचा
की तो मुस्लिमांना भ्यायचा
तो मुसलमानांच्या देशात राहायचा
आनंदाने,प्रेमाने
आणि मुस्लिमांच्या न जाणे कुठल्या मोहल्यात एकटा जायला घाबरायचा?

खरेतर,
तो देवाने बनवलेल्या मुस्लिमांना नाही भ्यायचा
कदाचित घाबरायचा,
तो.....
राजकारण,मिडिया आणि निवडणूका
यांनी तयार केलेल्या त्या काल्पनिक मुस्लिमांना
जे कल्पनेत तर खूप भयप्रद होते
परंतू प्रत्यक्षात ईदच्या शेवयांपेक्षाही
गोड होते.

मूळ हिंदी कविता

मेरा इक दोस्त अक्सर कहता था, कि ये 
कौमी एकता की बातें 
बस कहने में अच्छी लगती हैं.
कहता था, कि तुम कभी 
मुसलमानों के मोहल्ले में 
अकेले गए हो ?
कभी जाकर देखो. डर लगता है.  

वो मुसलमानों से बहुत डरता था 
हालांकि उसे शाहरुख़ खान बहुत पसंद था
उसके गालों में घुलता डिम्पल 
और उसकी दीवाली की रिलीज़ हुई फ़िल्में भी 
दिलीप कुमार यूसुफ़ है, वो नहीं जानता था 
उसकी फिल्में भी वो शिद्दत से देखता था  
वो उनसे नहीं डरता था
बस मुसलमानों से डरता था 

वो इंतज़ार करता था आमिर की क्रिसमस रिलीज़ का 
और सलमान की ईदी का
गर जो ब्लैक में भी टिकट मिले 
तो सीटियाँ मार कर देख आता था  
वो उनसे नहीं डरता था
बस मुसलमानों से डरता था 

वो मेरे साथ इंजीनियर बना 
विज्ञान में उसकी दिलचस्पी इतनी कि 
कहता था कि अब्दुल कलाम की तरह 
मैं एक वैज्ञानिक बनना चाहता हूँ  
और देश का मान बढ़ाना चाहता हूँ 
वो उनसे नहीं डरता था
बस मुसलमानों से डरता था 

वो क्रिकेट का भी बड़ा शौक़ीन था 
ख़ासकर मंसूर अली खान के नवाबी छक्कों का 
मोहोम्मद अज़हरुद्दीन की कलाई का 
ज़हीर खान और इरफ़ान पठान की लहराती हुए गेंदों का 
कहता था कि ये सारे जादूगर हैं
ये खेल जाएं तो हम हारें कभी न पाकिस्तान से 
वो उनसे नहीं डरता था
बस मुसलमानों से डरता था 

वो नरगिस और मधुबाला के हुस्न का मुरीद था 
उन्हें वो ब्लैक एंड व्हाईट में देखना चाहता था 
वो मुरीद था वहीदा रहमान की मुस्कान का
और परवीन बाबी की आशनाई का   
वो उनसे नहीं डरता था
बस मुसलमानों से डरता था 

वो जब भी दुखी होता था तो मुहम्मद रफ़ी के गाने सुनता था 
कहत था कि ख़ुदा बसता है रफ़ी साहब के गले में 
वो रफ़ी का नाम कान पर हाथ लगाकर ही लेता था 
और नाम के आगे हमेशा लगाता था साहब 
अगर वो साहिर के लिखे गाने गा दें 
तो ख़ुशी से रो लेने का मन करता था उसका 
वो उनसे नहीं डरता था
बस मुसलमानों से डरता था 

वो हर छब्बीस जनवरी को अल्लामा इकबाल का 
सारे जहाँ से अच्छा गाता था
कहता था कि अगर 
गीत पर बिस्मिल्ला खान की शहनाई हो 
और ज़ाकिर हुसैन का तबला 
तो क्या ही कहने ! 
वो उनसे नहीं डरता था
बस मुसलमानों से डरता था  

उसे जब इश्क़ हुआ तो लड़की से 
ग़ालिब की ग़ज़ल कहता 
फैज़ के चंद शेर भेजता 
उन्ही उधार के उर्दू शेरों पर पर मिटी उसकी महबूबा 
जो आज उसकी पत्नी है 
वो इन सब शायरों से नहीं डरता था
बस मुसलमानों से डरता था 

बड़ा झूठा था मेरा दोस्त 
बड़ा भोला भी 
वो अनजाने ही हर मुसलमान से 
करता था इतना प्यार 

फिर भी न जाने क्यों कहता था, कि वो 
मुसलमानों से डरता था 
वो मुसलमानों के देश में रहता था 
ख़ुशी ख़ुशी, मोहोब्बत से 
और मुसलमानों के न जाने कौन से मोहल्ले में 
अकेले जाने से डरता था 

दरअसल 
वो भगवान् के बनाए मुसलमानों से नहीं डरता था 
शायद वो डरता था, तो 
सियासत, अख़बार और चुनाव के बनाए 
उन काल्पनिक मुसलमानों से 
जो कल्पना में तो बड़े डरावने थे 
लेकिन असलियत में ईद की सेंवईयों से जादा मीठे थे

©निखिल सचान
Nikhil Sachan 

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने