ते
ज्यांनी क्रांतीची स्वप्ने पाहिली
ते आपल्याच घरात परक्यासारखे
राहिले आणि स्वकीयांमध्ये उपेक्षित.
ते
आस्तिकांमध्ये नास्तिक मानले गेले
दलितांमध्ये सवर्ण
पुरुषांमध्ये फेमिनिस्ट आणि
महिलांमध्ये पितृसत्ताकवादी
लोकांनी त्यांना आपापल्या सोयीनुसार
कधी जिहादी म्हटलं
कधी मनुवादी
तर कधी माओवादी.
ते जे सीमा मिटविण्याच्या
हट्टाला पेटले होते
त्यांना सर्वांनी ढकलून दिले-
आपापल्या अलंघ्य वृत्ताबाहेर.
ते!
जे ना बाबासाहेबांना नाकारू शकले
ना गांधीजींना
आणि ना भगतसिंगांना,
त्यांना नाकारलं सगळ्यांनी.
ते
ज्यांनी समतेचे स्वप्न बघू पाहिले
त्यांच्या नशिबी आली नाही
त्यांच्या वाट्याची झोप.
ते
खाचेत विभागलेल्या या जगात
कुठेही फिट नव्हते
खरेतर ते या व्यवस्थेत-
सर्वात मिसफिट लोक होते..!!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
[मिसफ़िट लोग]
वो जिन्होंने क्रांति के सपने देखे
वे अपने ही घर में पराए से रहे
और अपनों के बीच उपेक्षित.
वे आस्तिकों के बीच नास्तिक समझे गए
दलितों के बीच सवर्ण
पुरुषों के बीच फेमिनिस्ट
और महिलाओं के बीच पैट्रिऑर्कल
लोगों ने उन्हें अपनी-अपनी
सहूलियत से
कभी जेहादी कहा
कभी मनुवादी
तो कभी माओवादी.
वे जो लकीरों को मिटाने की
जिद में थे
उन्हें सबने धकेल दिया-
अपने-अपने अलंघ्य वृत्तों से बाहर.
वे! जो न तो अंबेडकर को नकार सके
न गांधी को
और न भगत को
उन्हें नाकार दिया सभी ने.
वे जिन्होंने बराबरी के स्वप्न देखने चाहे
उन्हें नसीब नहीं हुई
उनके हिस्से की नींद.
वे खांचों में बंटी इस दुनिया में
कहीं भी फिट नहीं थे
दरअसल वे इस सिस्टम में-
सबसे मिसफ़िट लोग थे..!!
©Ashok Kumar
अशोक कुमार