देश कागदावर बनलेला नकाशा नसतो

देश कागदावर बनलेला नकाशा नसतो

देश कागदावर बनलेला नकाशा नसतो

जर तुमच्या घरातील
एका खोलीत आग लागलेली असेल
तर काय तुम्ही
दुसर्‍या खोलीत झोपू शकाल?
जर तुमच्या घरातील एका खोलीत
प्रेतं कुजत असतील
तर काय तुम्ही
दुसर्‍या खोलीत प्रार्थना करू शकता?
जर होय
तर मला तुम्हाला
काहीच सांगायचे नाहीये!

देश कागदावर बनलेला
नकाशा नसतो
की एक भाग फाटल्याने
इतर भाग त्याच पद्धतीने संपूर्ण राहू शकेल
आणि नद्या,पर्वत,शहरं,गावं
तशीच आपापल्या जागी दिसावीत
खिन्नपणे!
जर तुम्ही हे मानत नसाल
तर मला तुमच्यासोबत 
राहायचे नाहीये!

या जगात माणसाच्या जीवापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही
ना ईश्वर
ना ज्ञान
ना निवडणूक
कागदावर लिहिलेला कुठलाही मजकूर
फाडला जाऊ शकतो
आणि भूमीच्या सात थरांच्या आत गाडला जाऊ शकतो

जो विवेक
उभा असेल प्रेतांना टेकून
तो आंधळा आहे
जे शासन 
चालत असेल बंदूकीच्या नळीने
मारेकर्‍यांचा धंदा आहे
जर तुम्ही हे मानत नसाल
तर मला
आता एक क्षणदेखील
तुम्हाला सहन करायचे नाहीये

लक्षात ठेवा
एका मुलाची हत्या
एक बाईचा मृत्यू
एका माणसाचा 
गोळ्यांनी चिंधड्या उडालेला देह
कुठल्या शासनाचेच नव्हे
संपूर्ण राष्ट्राचेच अधःपतन आहे

असे रक्त वाहून
धरतीत शोषित होत नाही
आकाशात फडकणार्‍या झेंड्यांना
काळे करते.
ज्या भूमीवर
सैन्याच्या बुटांच्या खूणा असतील
आणि त्यांच्यावर
प्रेतं कोसळत असतील
ती धरती
जर तुमच्या रक्तात
आग होऊन सळसळत नसेल
तर समजा की
तुम्ही ओसाड झाले आहात-
तुम्हाला इथे श्वास घेण्याचाही नाहीये अधिकार
तुमच्यासाठी नाही राहिला आता हा संसार

शेवटची गोष्ट
थेट आणि स्पष्ट
कुठल्या मारेकर्‍याला
कधी करू नका माफ
मग तो तुमचा मित्र असो
धर्माचा ठेकेदार असो
किंवा लोकशाहीचा
स्व-नाम-मुग्ध चौकीदार असो.

मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav 

मूळ हिंदी कविता

देश कागज पर बना नक्शा नहीं होता 

यदि तुम्हारे घर के
एक कमरे में आग लगी हो
तो क्या तुम
दूसरे कमरे में सो सकते हो?
यदि तुम्हारे घर के एक कमरे में
लाशें सड़ रहीं हों
तो क्या तुम
दूसरे कमरे में प्रार्थना कर सकते हो?
यदि हाँ
तो मुझे तुम से
कुछ नहीं कहना है।

देश कागज पर बना
नक्शा नहीं होता
कि एक हिस्से के फट जाने पर
बाकी हिस्से उसी तरह साबुत बने रहें
और नदियां, पर्वत, शहर, गांव
वैसे ही अपनी-अपनी जगह दिखें
अनमने रहें।
यदि तुम यह नहीं मानते
तो मुझे तुम्हारे साथ
नहीं रहना है।

इस दुनिया में आदमी की जान से बड़ा
कुछ भी नहीं है
न ईश्वर
न ज्ञान
न चुनाव
कागज पर लिखी कोई भी इबारत
फाड़ी जा सकती है
और जमीन की सात परतों के भीतर
गाड़ी जा सकती है।

जो विवेक
खड़ा हो लाशों को टेक
वह अंधा है
जो शासन
चल रहा हो बंदूक की नली से
हत्यारों का धंधा है
यदि तुम यह नहीं मानते
तो मुझे
अब एक क्षण भी
तुम्हें नहीं सहना है।

याद रखो
एक बच्चे की हत्या
एक औरत की मौत
एक आदमी का
गोलियों से चिथड़ा तन
किसी शासन का ही नहीं
सम्पूर्ण राष्ट्र का है पतन।

ऐसा खून बहकर
धरती में जज्ब नहीं होता
आकाश में फहराते झंडों को
काला करता है।
जिस धरती पर
फौजी बूटों के निशान हों
और उन पर
लाशें गिर रही हों
वह धरती
यदि तुम्हारे खून में
आग बन कर नहीं दौड़ती
तो समझ लो
तुम बंजर हो गये हो-
तुम्हें यहां सांस लेने तक का नहीं है अधिकार
तुम्हारे लिए नहीं रहा अब यह संसार।

आखिरी बात
बिल्कुल साफ
किसी हत्यारे को
कभी मत करो माफ
चाहे हो वह तुम्हारा यार
धर्म का ठेकेदार,
चाहे लोकतंत्र का
स्वनामधन्य पहरेदार।

 ©सर्वेश्वरदयाल सक्सेना 
         (१९२७-१९८३)

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने