जल्लादाने राजाला सवाल केला,
महाराज
आपण आपल्या सिंहासनाला
आणखी किती उंचीवर घेऊन जाणार आहात?
आणि त्यासाठी आणखी किती प्रेतांची गरज पडणार आहे?
कारण आता या देशात शेवटची दोनच माणसं बचावली आहेत.
एक मी आणि दूसरे आपण.
अगोदर आपण सुळावर चढू इच्छिणार की मला चढवणार?
जर आपण आधी मला लटकवणार असाल तर आपणांस माझी भूमिका निभावावी लागेल,
ते निभावणे कदाचित आपणास रूचणार नाही
कारण आपण राजा आहात.
म्हणून असे करूया की अगोदर मी आपणांस सुळावर चढवतो!
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
🍁
मूळ हिंदी
जल्लाद ने राजा से एक सवाल
किया
महाराज
आप अपने सिंहासन को
और कितनी ऊँचाईयों तक ले जाना चाहते हैं
और इसके लिये कितनी लाशों की जरूरत पड़ेगी
क्योंकि
अब इस देश में
आखिरी दो ही इंसान बचे रह गए हैं
एक मैं
और दूसरे आप
पहले आप सूली पर चढ़ना चाहेंगे
या मुझे चढ़ाएँगे
यदि पहले आप मुझे चढ़ाते हैं
तो आपको मेरा किरदार निभाना पड़ेगा
वह शायद आप निभाना पसंद नहीं करेंगे
क्योंकि आप राजा हैं
इसलिये ऐसा करते हैं कि
पहले मैं आपको सूली पर चढ़ा देता हूँ
©शेफाली चौबे
shefali choube