स्वधर्माशीच प्रतारणा करीत असतात
अवघ्या दुनियेच्या तोंडात
जेव्हा जबरदस्तीने कोंबले जात होते
हे शब्द की 'शीख दहशतवादी असतात'
माझ्या आजीने तेव्हा म्हटले होते
'शीख दहशतवादी नसतात
ते अडचणीच्या काळातले सर्वात विश्वासू सोबती असतात,'
मी उघडपणे सत्तेच्या गोळ्यांनी मरताना पाहिले शीखांना
वर्तमानपत्रांनी भरभरून लिहिले ते दहशतवादी असल्याचे,
मी त्यांना दहशतवादी नाही म्हणू शकलो,
आज विचार करतोय
किती योग्य होती आजी
शेताची नांगरट करणारा रामजीकाका
जेव्हा खाली बसून चहा पिऊ लागला
तेव्हा आजोबाने म्हटले होते
रामजी बाजेवर बस,आमच्या घरात हे चालत नाही
रामजीकाकाने अजिबात ऐकले नाही आजोबाचे
चहा पिऊन कप धुवून उंबरठ्यावर ठेऊन गेला
जाता जाता म्हणाला रामजीकाका
'शेठजी तुमच्या इथे चालत नाही
जगात हेच चालतंय!
आम्ही सवय बिघडवू शकत नाही आमची,'
आज्याच्या डोळ्याची कडा ओलावली त्यावेळेस
ते काही बोलू शकले नव्हते.
मी आयुष्यभर रामजीकाकाच्या मुलांसोबत खेळलो
माझ्याविषयी भरभरून तक्रारी आल्या घरी की
तुमचा पोरगा चांभारांसोबत खेळतो,
त्याला समजावून सांगा
आणि मग आजी खडसावत असे,
'समजावण्याची गरज तुम्हांला आहे
माझ्या पोराला नव्हे.'
आमच्या तोंडी घातले गेले शब्द
की मुस्लीम दहशतवादी असतात
आम्ही विचारले आज्जा-आजीला
तुम्हाला मुस्लिमांनी लूटले-कापले-पळवून लावले तरिही तुम्ही त्यांना वाईट का म्हणत नाहीत?
ते समजावत असत,
'आम्ही आयुष्यभर मुस्लिमांचे शेजारी राहिलो
ते आमच्या सुखा-दुःखाचे सोबती होते
वैरी तर नक्कीच नव्हते
ज्यांनी आम्हाला लूटले
ते भडकवले गेलेले लोक होते
भडकवण्यात आलेला मनुष्य सर्वात आधी स्वधर्माशीच प्रतारणा करीत असतो
जसे तू भडकवला जात आहेस सद्या'
विचार करतोय
आज्जा-आजी किती उत्तमप्रकारे
जाणत होते सत्याला
दुनियेने पाहिल्या आहेत
बौद्ध स्तूप तोडफोडीच्या बिभत्स घटना
आणि
मारले गेलेले बौद्ध भिक्खु.
विश्वातील अहिंसक धम्माशी आम्ही हिंसा केली
भडकवण्याचा काळ तेव्हाही राहिला असेल
बौद्ध स्तूप फोडणार्यांच्या मुलांनी
कालांतराने बौद्ध धम्म स्विकारला
त्यांचे पूर्वज आपल्या चूकांबद्दल
क्षमा नाही मागू शकले.
आजी सांगायची
भडकवला गेलेला मनुष्य
सर्वात आधी स्वधर्माशीच प्रतारणा करीत असतो,
मग आपण
धर्माशी प्रतारणा केलेल्या पूर्वजांची संताने आहोत का?
मराठी अनुवाद
भरत यादव
Bharat Yadav
मूळ हिंदी कविता
बरगलाए गए लोग सर्वप्रथम
अपने ही धर्म से विमुख होते हैं
पूरी दुनिया के मुंह मे
जब जबरन डाले जा रहे थे ये शब्द
कि "सिख आतंकवादी होते हैं"
मेरी दादी ने तब कहा था
सिख आतंकवादी नही होते
वे मुश्किल समय के सबसे विश्वस्त साथी होते हैं,
मैंने सरे आम सत्ता की गोलियों से मरते देखे सिख
अखबारों ने भर-भर लिखा उन्हें आतंकवादी
मैं उन्हें आतंकवादी नही कह पाया
आज सोचता हूं
कितनी सही थी दादी
जमीन जोतने वाला रामजी काका
जब नीचे बैठकर कर चाय पीने लगा
तो दादा जी ने कहा था
रामजी चारपाई पर बैठ
हमारे घर ये नही चलता
रामजी काका ने एक नही सुनी दादा जी की
चाय पीकर
कप धोकर
चौखट पर रखकर गया कप
जाते जाते कह गया रामजी काका
सेठजी आपके यहाँ नही चलता
दुनिया मे यही चलता है
हम आदत खराब नही कर सकते अपनी,
दादा जी की आंख के कोर पर
एक बूंद आ ठहरी थी उस वक्त
वे कुछ बोल नही सके
मैं उम्र भर रामजी काका के बच्चों के साथ खेला
मेरी भर-भर शिक़ायतें आईं घर
कि तुम्हारा बेटा चमारों के साथ खेलता है
उसे समझाओ
और दादी कहती
समझने की जरूरत तुम्हें है
मेरे बच्चों को नही।
हमारे मुंह मे डाले गए शब्द
कि मुस्लमान आतंकी होते हैं
हमने पूछा दादा दादी से
आप को मुसलमानों ने लूटा काटा भगाया
फिर भी आप उन्हें बुरा नही कहते?
वे समझाते
हम जीवन भर मुसलमानों के पड़ोसी रहे
वे हमारे दुख-सुख के साथी थे
दुश्मन तो क़त्तई नही थे,
जिन्होंने हमे लूटा
वे बरगलाए हुए लोग थे
बगरलाया गया इंसान सबसे पहले
अपने ही धर्म से विमुख होता है
जैसे तुम बरगलाए जा रहे हो अब
सोचता हूं
दादा-दादी कितना बेहतर जानते थे सच
दुनिया ने देखा
बौद्ध स्तूप तोड़े जाने का विभत्स मंजर
और मारे गए बौद्ध भिक्षुक
विश्व के अहिंसक धर्म के साथ हिंसा हमने की
बरगलाए जाने का दौर तब भी रहा होगा
बौद्ध स्तूप तोड़ने वालों के बच्चों ने
कालांतर में बौद्ध धर्म चुना
उनके पूर्वज अपनी गलतियों पर क्षमा नही मांग सके
दादी कहती थी
बरगलाया गया इंसान
सबसे पहले अपने ही धर्म से विमुख होता है
क्या हम
धर्म से विमुख हुए पूर्वजों की संतानें हैं?
©वीरेंदर भाटिया
Virender Bhatia